महाराष्ट्र

Sinnar Bus Station: सिन्नर तालुक्याला पावसानं झोडपलं; शिवशाहीवर 'हायटेक' बस स्थानकाचं छत कोसळलं

Nashik Rain Update: सिन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसाच्या तडाख्यानं सिन्नरचं हायटेक बस स्थानक बस कोसळलंय.

Bharat Jadhav

महाराष्ट्रात १२ दिवसाआधीच मॉन्सूनने आगमन केलं असून विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची सुरुवात देखील झालीय. नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वारा आणि पावसाच्या तडाख्यानं सिन्नर बस स्थानकाचं छत शिवशाही बसवर कोसळसल्याची घटना घडलीय. बसमधील प्रवाशी जखमी झालेत.

तुफानी पावसामुळे सिन्नरच्या हायटेक बसस्थानकाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बसस्थानक रिकामा करण्यात आला आहे. तसेच प्रवाशांना देखील बाहेर काढण्यात आले आहे. तर या घटनेमुळे सिन्नर शहरातील सर्व रस्ते बंद झाले असून, वाहतूक ठप्प झालीय. हे बसस्थानक सिन्नरचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निधीतून उभारण्यात आले आहे.

पुण्यातील घटना; पावसाच्या पाण्यात इनोव्हा वाहून गेली

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दौंड तालुक्यात पावसाने जोर धरलाय. पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. पावसाच्या हाहाकारामुळे पुणे सोलापूर महामार्गावर पावसाचे पाणी साचले असून त्या पाण्यात इनोव्हा कार वाहून गेली. अवकाळी पावसामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्पा झालीय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

१२ दिवस आधीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन

केरळमध्ये मान्सून शनिवारी दाखल झाला होता, आज महाराष्ट्रात आगमन झाले. त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये मान्सून राज्यात दाखल झाला. मान्सूनचे आगमन झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. सकाळपासून मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT