Nashik Pune highway accident  Saam
महाराष्ट्र

Nashik Accident : नाशिक-पुणे महामार्गावर वृद्ध चालकाच्या कारचा थरार; तरुणीचा जागीच मृत्यू, ४ जखमी

Nashik Accident News 2026 : नाशिक-पुणे महामार्गावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला असून ३-४ जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Nashik Pune highway accident young woman killed details : नाशिकमध्ये शुक्रवारी भीषण अपघातात तरूणीचा मृत्यू झालाय. महामार्गाच्या बाजूला उभं राहिलेल्या तरूणीला एका भरधाव कारने जोरात धडक दिली. या धडकेत त्या तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर परिसरात ही घटना घडली. या अपघातात ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ती तरुणी नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर परिसरात रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याच वेळी एका भरधाव कारने रस्त्यावरील ४ ते ५ दुचाकींना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात उभी असलेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात इतर दुचाकीस्वारही जखमी झाले आहेत. त्या सर्वांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातानंतर घटनास्थळी महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत कार चालवणाऱ्या वृद्ध व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा नाशिक पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT