Nashik Niphad New x
महाराष्ट्र

हृदयविकाराच्या झटक्याने मुलाचा मृत्यू, लेकाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईनेही प्राण सोडले

Nashik Niphad News : निफाड शहरामधून एक वाईट बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याे आईने देखील प्राण सोडले.

Yash Shirke

  • निफाड शहरात हृदयविकाराच्या झटक्याने मुलाचा मृत्यू झाला, तर धक्क्याने आईनेही प्राण सोडले.

  • सुनील गोळे (४६) यांच्या मृत्यूनंतर काही तासांतच त्यांची आई जिजाबाई गोळे (७०) यांचेही निधन झाले.

  • मायलेकांच्या निधनामुळे गोळे कुटुंबावर शोककळा पसरली असून निफाड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Niphad News : नाशिकच्या निफाड शहरातून दु:खद माहिती समोर आली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने एका ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच धक्क्याने आईने प्राण सोडले. मुलानंतर आईचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे निफाड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निफाड शहरात पेठ गल्लीमध्ये सुनील गोळे (वय ४६ वर्ष) यांचा अपघात झाला होता. ते घराच्या बाथरुममध्ये पाय घसरुन पडले होते. गंभीर दुखापत झाल्याने सुनील यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात असताना सुनील यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सुनील यांच्या मृत्यूची बातमी घरी त्यांच्या आई जिजाबाई गोळे (वय ७० वर्ष) यांना समजली. मुलाच्या मृत्यूचा जिजाबाई यांना धक्का बसला. त्यांनाही तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना जिजाबाई यांचाही मृत्यू झाला. सुनील यांच्यानंतर लगेच त्यांच्या आईने, जिजाबाई गोळे यांनी देखील प्राण सोडले.

कुटुंबातील दोघांचा लागोपाठ मृत्यू झाल्याने गोळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. निफाड शहरातील अमरधाम येथे गोळे मायलेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील यांच्या वडिलांचे सात वर्षांपूर्वी निधन झाले होते. सुनील यांचे वडील संपत गोळे हे लोकप्रिय पैलवान होते. ते पोलीस विभागामध्ये होते. संपत गोळे हे पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prasad Oak: रील्स म्हणजे अभिनय नाही...; प्रसाद ओकच्या वक्तव्याने रंगली चर्चा, सोशल मीडियावर नवा वाद पेटणार

Pune Traffic: पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; गणेशोत्सवात शहरातील प्रमुख रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Manoj Jarange & Nitesh Rane: देवेंद्रजींच्या आईबद्दल अपशब्द काढले तर..वळवळणारी जीभ काढून; नितेश राणेंचा मनोज जरांगेना इशारा|VIDEO

Ashish Shelar: निवडणूक तोंडावर तरीही का बदलला मुंबई भाजप अध्यक्ष? आशिष शेलार यांनी सांगितली रणनीती

Maharashtra Live News Update: राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार उद्या होणार

SCROLL FOR NEXT