Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमावरून परतताना झाला घात; विहिरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू

Nashik News : सतीश जाधव याच्या मित्राचे आज लग्न होते. तर मंगळवारी (६ मे) हळदीचा कार्यक्रम असल्याने सतीश हा मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी सोमठाणे येथे गेला होता हळद लागल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाला

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

नाशिक : मित्राचे लग्न असल्याने हळदीच्या कार्यक्रमाला गेला. रात्री उशिरा कार्यक्रमाहून परत घरी जाणाऱ्या मित्राचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याचे घटना घडली आहे. रात्री घरी जाताना त्याच्या मोटरसायकलला अपघात झाला. यात थेट खोल विहिरीत पडला. विहिरीत पाणी असल्याने त्याला बाहेर निघत न आल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सोमठाणे परिसरात सदरची घटना रात्रीच्या सुमारास घडली. सतीश रामकृष्ण जाधव असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान सतीश जाधव याच्या मित्राचे आज लग्न होते. तर मंगळवारी (६ मे) हळदीचा कार्यक्रम असल्याने सतीश हा मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी सोमठाणे येथे गेला होता. हळद लागल्यानंतर नाचला यानंतर तो घरी जाण्यासाठी निघाला होता. 

विहिरीच्या कठड्याला दुचाकीची धडक 

हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना एरंडगाव- सातारे रस्त्यावर अंधारामुळे वळण रस्ता लक्षात आला नाही. यामुळे दुचाकीसह तो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या कठड्याला मोटर सायकलची धडक बसली. यानंतर मोटरसायकल स्वार विहिरीच्या पाण्यात पडला. यावेळी विहिरीत पाणी अधिक होते व त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.  

आज सकाळी घटना उघड 

दरम्यान रात्री रस्त्यावरून रहदारी नसल्याने घडलेल्या घटनेबाबत कोणालाही माहिती मिळाली नाही. तर आज ही घटना लक्षात आल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवला आहे. दरम्यान घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT