Bhiwandi : धक्कादायक! लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीची विक्री; ११ जणांवर गुन्हा दाखल

Bhiwandi News : भिवंडी तालुक्यातील पिलंझे गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात केवळ एक लाख वीस हजार रुपयांच्या मोबदल्यात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याचा गंभीर प्रयत्न उघडकीस आला
Bhiwandi News
Bhiwandi NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 
भिवंडी
: केवळ पैसा यासाठी अल्पवयीन मुलींची लग्नाच्या नावाखाली विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १ लाख २० हजार रुपयात मुलीचा सौदा करण्यात आला होता. मात्र श्रमजीवी संघटनेने हा प्रकार उजेडात आणून गणेशपुरी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भिवंडी तालुक्यातील पिलंझे गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात केवळ एक लाख वीस हजार रुपयांच्या मोबदल्यात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याचा गंभीर प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकाराने मानवी विक्रीसारखी गंभीर मानवताविरोधी कृती उजेडात आली आहे. दरम्यान श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा सौदा थांबवण्यात यश आले. 

Bhiwandi News
Pachora News : सोशल मीडियावरून जुळले प्रेम; सोबत राहण्याचा निर्णय पण.., चिमुकल्यासह दोघांची रेल्वेखाली उडी

वऱ्हाड निघाले असताना अडविली गाडी 

सदर प्रकरणात कातकरी समाजातील आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीचा १ लाख २० हजार रुपयांत सौदा करण्यात आला होता. विवाहाच्या नावाखाली हा प्रकार वास्तवात मुलीची विक्रीच असल्याचे स्पष्ट होते. लग्नाचे वऱ्हाड हा विवाह पार पडून नवरदेवाच्या गावाकडे परत निघाले असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते दयानंद पाटील यांना मिळाली. यानंतर त्यांनी तातडीने वऱ्हाडाची गाडी थांबवली आणि संपूर्ण प्रकाराची माहिती संघटनेचे संस्थापक तथा आदिवासी आढाव क्षेत्र अध्यक्ष विवेक पंडित यांना दिली. 

Bhiwandi News
Accident News : वाहनाच्या धडकेत २० फूट फेकले गेले; मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

नवरदेवसह ८ जण पोलिसांच्या ताब्यात 

याबाबत गणेशपुरी पोलिसांना कळवल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिपान सोनवणे हे तात्काळ घटनास्थळी आले. यानंतर त्यांनी नवरा मुलासह वऱ्हाडातील इतर सदस्य आणि दलाल अशा एकूण ८ जणांना ताब्यात घेतले. तर मुलीचे आई, वडील व काका फरार आहेत. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच मानवी अपव्यापाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. कुणाचा कितीही दबाव आला तरी त्या दबावाला बळी न पडता याबाबत कायदेशीर कारवाई करा व जे कोणी यामध्ये सहभागी असतील त्यांना आरोपी करा; अशी मागणी पंडित यांनी पोलिसांकडे केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com