Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचा कहर सुरूच; अनेक भागात गारपिटीसह जोरदार पाऊस, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Maharashtra Weather : हवामान विभागाकडून काही जिल्ह्याना येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार या अंदाजानुसार आज देखील राज्यातील अनेक भागात अवकाळीचा कहर पाहण्यास मिळाला आहे
Maharashtra Weather
Maharashtra WeatherSaam tv
Published On

Maharashtra Weather राज्यात मागील तीन- चार दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्याना येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार या अंदाजानुसार आज देखील राज्यातील अनेक भागात अवकाळीचा कहर पाहण्यास मिळाला आहे. वादळी वारा तसेच गारपिटीसह जोरदार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

धुळे जिल्ह्यात अवकाळीने पपई व मक्का पिकाचे नुकसान
धुळे
: धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यात साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे मक्का पिकासह पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिंपळनेर परिसरात मक्का पिक जमीनदोस्त झाले आहे. पावसासोबत आलेल्या वादळामुळे पपई चे झाडे तुटून पडल्यामुळे पपई पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे.

Maharashtra Weather
Gulabrao Patil : ज्यांच्या घरचे गेले त्यांना विचारा कशावर हल्ला करावा; नाना पटोलेंच्या विधानावर गुलाबराव पाटील यांचे जोरदार प्रतिउत्तर

अकोला जिल्ह्यात गारपीट 

अकोला : अकोल्यात काल सायंकाळी आणि रात्री अवकाळी पावसासह गारपीट झाली. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, बाळापूर, अकोला, आणि काहीशी पातूर तालुक्याला अवकाळीने झोडपून काढलं. जोराच्या वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट देखील सुरु होता. तेल्हारा आणि बाळापूर तालुक्यात गारपिट झाली आहे. तर बाळापुर तालुक्यात निंबू, आंबा, कापणी करून ठेवलेला कांदासह अन्य फळबागांचं मोठं नुकसान झाले आहे.

Maharashtra Weather
Bhiwandi : धक्कादायक! लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीची विक्री; ११ जणांवर गुन्हा दाखल

नाशिक जिल्ह्यात अवकाळीने नुकसान
नाशिक
: नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. जिल्ह्याच्या बहुतांश भागात गारा व जोरदार झालेल्या पावसामुळे काढून ठेवलेला कांदा भिजला. तर झाडाला लागलेल्या कैऱ्या तुटून पडल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले. रोज होत असलेल्या पावसामुळे बळीराजाचे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. 

रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
रायगड
: रायगड जिल्ह्याच्या बहुतांश भागात रात्री उशिरा अवकाळी पावसाने हजेरी लावली. दक्षिण रायगडच्या माणगाव, गोरेगाव, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर तालुक्यात मध्यम तर अलिबाग, पेण, मुरूड, खोपोली भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. जोरदार वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. अखेरच्या टप्प्यातील आंबा पिकाचे पावसाने नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील २४ तासात जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com