Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : नाशिकमध्ये खळबळ; प्रेमसंबंधाचा अखेर शेवट, तणावातून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Nashik News : तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. याबाबत तरुणीच्या कुटुंबियांना माहित झाले होते. यामुळे मागील काही दिवसांपासून तरुणीचे कुटुंबीय संबंधित तरुणास सतत धमक्या देत होते

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
नाशिक
: तरुणीवर जीवापाड प्रेम केले. परंतु हेच प्रेम त्याच्या जीवनाचा शेवट ठरले आहे. कारण तरुणी सोबत असलेल्या प्रेमसंबंधाने तरुणीच्या कुटुंबियांकडून तरुणाला सातत्याने त्रास दिला जात होता. यामुळे तणावात येऊन तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.  

नाशिकच्या बागलाण मधील जायखेडा येथील विकी रवींद्र अहिरे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विकी अहिरे याने प्रेमसंबंधातील सततच्या तणावाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र सदरच्या घटनेनंतर तरुणाच्या कुटूंबीय संतप्त झाले असून मुलीच्या कुटुंबियांवर आरोप केले आहेत. 

तरुणास सातत्याने धमक्या देत त्रास 

सदर तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. याबाबत तरुणीच्या कुटुंबियांना माहित झाले होते. यामुळे मागील काही दिवसांपासून तरुणीचे कुटुंबीय संबंधित तरुणास सतत धमक्या देत होते. तसेच त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास देत होते, असा आरोप विकी याच्या कुटुंबीय व नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. यातूनच विकीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. 

कठोर कारवाईची मागणी 

घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून मृतदेहाचे पोस्टमार्टम न करता प्रथम संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी केली आहे. तसेच मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी, संबंधित व्यक्तींपैकी एक होमगार्ड असल्याने त्याला तत्काळ सेवेतून निलंबित करावे. अन्यथा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही; अशी भूमिका घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

SCROLL FOR NEXT