Nashik Malegaon Crime News Saam TV
महाराष्ट्र

Malegaon Crime : शेतात एकटीच गेली होती महिला; अज्ञात व्यक्तीनं केलं क्रूर कृत्य, धक्कादायक घटनेनं खळबळ

शेतात काम करण्यासाठी गेलेल्या एका महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून फेकून देण्यात आले आहेत.

Satish Daud

अजय सोनावणे, साम टीव्ही

मालेगाव : राज्यात एककीकडे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, नाशिकमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या एका महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून फेकून देण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दहिदी गावात मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुमनबाई भास्कर बिचकुले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमनबाई ही महिला शेतात एकटीच काम करीत होती. तर तिचे पती भास्कर हे मका विक्रीसाठी बाजारात गेले होते.

दरम्यान, कांद्याना पाणी भरण्याचं काम करत असतानाच अज्ञात व्यक्तीने सुमनबाई यांच्यावर फावड्याने हल्ला केला. अज्ञाताने सुरुवातीला सुमनबाईच्या दोन्ही पायांचे तुकडे केले. त्यानंतर त्यांना फरफटत जंगलात नेले. हल्लेखोर इतक्यावर थांबला नाही. तर ,त्याने मृत सुमनबाई यांच्या छातीवर आणि गळ्यावर वार केले.

तसंच त्यांचं शीर धडावेगळं करण्याचा प्रयत्न केला. हत्येनंतर हल्लेखोर (Crime News) पसार झाला. दरम्यान, सुमनबाई यांचे पती भास्कर बिचकुले हे शेतात आल्यानंतर त्यांना सुमनबाई दिसून आल्या नाही. त्या घरी गेल्या असाव्यात असं त्यांना वाटलं. दरम्यान, घरी आल्यानंतरही सुमनबाई दिसून न आल्याने त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांची शोधाशोध घेतली.

बऱ्याच वेळानंतर सुमनबाई यांचा मृतदेह शेतालगत असलेल्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.या भयंकर घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुमनबाई यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haldi Kumkum Gifts: हळदी- कुंकूवात सुवासिनींना वाण काय द्यायचे? या आहेत स्वस्तात मस्त 5 वस्तू

Fluffy Pav Recipe : घरीच बनवा बाजारात मिळतात तसे फ्लॅफी पाव, जाणून घ्या रेसिपी

Maharashtra Live News Update : डोंबिवलीत शिवसेना–भाजप हाणामारी प्रकरणाला नवे वळण! दोन्ही गटांवर गुन्हे दाखल, पोलिस बंदोबस्त कडक

Badlapur : बदलापूर स्वीकृत नगरसेवक प्रकरणात नवा ट्विस्ट, भाजपच्या नव्या उमेदवारावर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये राजकारण तापले, नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते भिडले, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT