Nashik News : खेळता खेळता लिफ्टच्या खड्ड्यात पडला अन्.., १० वर्षीय चिमुकल्यासोबत घडली दुर्देवी घटना

लिफ्टसाठी बनवण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका १० वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
Nashik News
Nashik NewsSaam TV

तबरेज शेख, साम टीव्ही

Nashik News : नाशिक जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. लपाछुपी खेळत असताना लिफ्टसाठी बनवण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका १० वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गंगापूर शिवारातील ध्रुवनगरमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गंगापूर पोलिसांनी संबंधित बिल्डरवर गुन्हा दाखल केला आहे.(Latest Marathi News)

Nashik News
Viral News : केस ओढले, लाथाबुक्क्यांनी हाणलं, भररस्त्यात मुलींमध्ये WWE चा थरार, पोरं फक्त बघतच राहिली!

यश सुभाष भागवत (वय १० वर्ष) असं मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. यश हा त्याच्या मित्रांसोबत ध्रुवनगर येथे सुरू असलेल्या नवीन इमारतीजवळ खेळत होता. या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी एक लिफ्टसाठी खड्डा तयार करण्यात आला होता. या खड्ड्यात पाणी भरण्यात आले होते. हा खड्डा उघडाच होता.

दरम्यान, यश खेळता-खेळता या इमारतीजवळ गेला. यावेळी त्याला समोरील खड्डा दिसला नाही. त्यामुळे तो खड्ड्यात पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो पाण्यात बुडून मरण पावला. या दुर्देवी घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nashik News
Palghar Crime : चिमुकल्यांच्या डोळ्यांदेखत त्याने पत्नीला संपवलं; थरकाप उडवणारी घटना

दरम्यान, इमारतीचे बांधकाम करताना बिल्डरने प्लॉटच्या चहूबाजूला पत्र्यांचे कंपाउंड केलेले नाही. त्याठिकाणी वॉचमनही नेमलेला नाही. लिफ्टच्या खड्ड्याभोवतील कोणत्याही संरक्षक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे बिल्डर तोंडूलकर यांच्याविरोधात यशच्या मृत्युस कारणीभूत ठरवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com