Mumbai- Nashik Highway Saam tv
महाराष्ट्र

Mumbai- Nashik Highway: मुंबई- नाशिक महामार्गावर चक्काजाम; धनगर समाजाला आरक्षण विरोधात आदिवासींचे आंदोलन

Nashik Shahapur News : आदिवासी आंदोलनाकांचा मुंबई- नाशिक महामार्गावर चक्काजाम; धनगर समाजाला आरक्षण देण्याला विरोध

Rajesh Sonwane

फैयाज शेख

शहापूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देऊ नये; यासह विविध प्रमुख मागण्यासाठी आज आदिवासी समाजाच्यावतीने मुंबई- नाशिक (Nashik) महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. हजारोच्या संख्येने आदिवासी बंधू भगिनींनी या आंदोलनात सहभाग घेतला. (Tajya Batmya)

आदिवासी आरक्षण बचाव समितीच्यावतीने हे आंदोलन  करण्यात आले. आमच्या ४४ जातींमध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये; अन्यथा २५ आमदार आणि चार खासदार राजीनामा दिल्याशिवाय (Dhangar Reservation) राहणार नाहीत. असा इशारा या आंदोलनात देण्यात आला. शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन मोर्चा काढण्यात आले. चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी जाम झाली आहे. 

मुंबईचा पाणीपुरवठा बंदचा दिला इशारा 

धनगर समाजाला आरक्षण देण्यावरून आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. आंदोलनात शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच शासनाने आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले, तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणी बंद करू; असा इशारा आंदोलनकर्त्यानी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT