Supriya Sule on Ajit Pawar Rakshabandhan Saam TV
महाराष्ट्र

Supriya Sule on Ajit Pawar : अजितदादांना आज राखी बांधणार का?सुप्रिया सुळेंनी दिलं एका वाक्यात उत्तर

Satish Daud

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र दिवाळी साजरी केल्याचं बघायला मिळालं होतं. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बहीण भावाच्या नात्यात दुरावा आला. आज रक्षाबंधनाचा सण असल्याने सुप्रिया सुळे अजित पवार यांना राखी बांधणार का? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळेंनी भगरे यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. इतकंच नाही, तर राखी बांधतानाचा व्हिडीओ देखील सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केला.

दरम्यान, आज सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर टीका केली. महाराष्ट्र सरकारकडे लाडकी बहीण योजनेशिवाय बोलण्यासारखं काहीही उरलेलं नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी 200 कोटी रुपयांचा खर्च करुन जाहिरात दिली जाते हे दुर्दैव आहे. तेच पैसे आशा वर्कर्स आणि अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना दिले असते तर त्यांची दिवाळी गोड झाली असती. आमचं सरकार आल्यानंतर या योजनेत आम्ही आणखी सुधारणा आणणार आहोत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजितदादांना राखी बांधणार का?

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांना तुम्ही आज राखी बांधणार का? असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला. यावर सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, माझा आज दिवसभर नाशिकचा दौरा आहे. रात्री 10 ते 11 पर्यंत इथल्या कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी प्रोग्राम ठरवला आहे. त्यामुळे आधी लगीन कोंडाण्याचं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विषय संपवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT