Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

Punegaon-Daraswadi Canal: पावसाळ्यापूर्वी पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे काम होणार पूर्ण, मंत्री भुजबळ यांनी केली पाहणी

Chhagan Bhujbal News: पावसाळ्यात पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे पाणी डोंगरगाव येथे पोहाेचेल यादृष्टीने या कालव्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे, असे निर्देश छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले.

साम टिव्ही ब्युरो

Nashik News:

यंदाच्या पावसाळ्यात पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे पाणी डोंगरगाव येथे पोहाेचेल यादृष्टीने या कालव्याचे काम जलदगतीने पूर्ण करावे, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.

आज दिंडोरी तालुक्यातील मावडी, खडकजाम यासह विविध ठिकाणी पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांची व प्रकल्पाच्या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगरचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, नांदूर मध्यमेश्वर विभागाच्या कार्यकारी अभियंता संगिता जगताप, पुणेगाव कालव्याच्या उपविभागीय अभियंता योगिता घुगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, सद्य:स्थितीत एकूण १२ कि.मी , २८ कि.मी, ३५ कि.मी व ५२ कि.मी च्या टप्प्यांवर पुणेगाव-दरसवाडी कालव्याचे काम सुरू आहे. यात प्रामुख्याने कालव्या दरम्यान स्ट्रक्चर आणि पुलांच्या कामास गती द्यावी. (Latest Marathi News)

यासाठी आवश्यक त्याठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे व अधिकचे मनुष्यबळ लावून दर्जात्मक काम ३१ मे पूर्वी पूर्ण करण्यात यावे. यासाठी आवश्यक निधीची पूर्तता करण्यात आली असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

आजपर्यंत १२ कि.मी मध्ये २ कि.मी आणि ४९ कि.मी मध्ये ४ कि.मी असे एकूण ६ किमी लेव्हल काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे ४९ किमी मध्ये ९०० मीटर काँक्रीटीकरण काम झाले आहे. या कालव्यावर आजमितीस १२ किमी मध्ये ६ मशीन, २८ किमी मध्ये ६ मशीन तर ३५ किमी मध्ये ६ मशीन असे एकूण १८ मशीनने अतिशय गतीने काम सुरू आहे. या सुरू असलेल्या कामाची परिस्थिती पाहता निश्चितच कालव्याचे काम मे अखेर पर्यंत काँक्रीटीकरण करण्याचे काम १५ जून अखेर पूर्ण होणार असल्याचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT