Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nandgaon : पोषण आहार शिजवताना कुकर फुटला; दोन महिला जखमी, मोठा अनर्थ टळला

Nashik News : आजच्या घटनेने शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन याबाबत सरकारने उपाययोजना कराव्यात; अशी मागणी जोर धरू लागली आहे

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
नाशिक
: शाळांमध्ये विद्यार्थांना दिला जाणारा पोषण शाळेतच शिजविले जात असतो. त्यानुसार शाळेत पोषण आहार शिजवत असताना आज दुर्घटना घडली असून आहार शिजवत असताना गॅसवर ठेवण्यात आलेला कुकर अचानकपणे फुटल्याची घटना नांदगाव नगरपरिषदेच्या शाळेत घडली आहे. यात जवळच असलेल्या दोन महिला जखमी झाल्या असून यात मोठी दुर्घटना टळली आहे. 

नाशिकच्या नांदगाव येथील नगर परिषदेच्या सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सरकारच्या माध्यान्य भोजन योजनेत शाळेतील विद्यार्थ्यांना आता शिजविलेले अन्न दिले जात असते. यासाठी शाळेच्या आवारातच पोषण आहार तयार करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानुसार सकाळ सत्रातील शाळा सुरु असताना आहार शिजविला जात होता. 

कुकर फुटल्याने अन्न उडाले अंगावर 

मात्र पोषण आहार शिजवताना अचानकपणे कुक्कर फुटला व यात शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला किरकोळ भाजल्या गेल्या आहेत. दैव बलत्वर म्हणून त्या वाचल्या आहेत. मुळात गेल्या अनेक वर्षांपासून याच महिला शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना विमा संरक्षणासाठी लढा देत असुन आज त्यांच्यावरच ही वेळ आली आहे. 

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 

घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी गणेश पाटील, शाळेचे मुख्याध्यापक जनाब शहीद अख्तर यांनी तात्काळ धाव घेऊन मदत केली. तसेच जखमी झालेल्या महिलांना औषधोपचार केले. दरम्यान आजच्या घटनेने शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन याबाबत सरकारने उपाययोजना कराव्यात; अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baaghi 4 vs The Bengal Files : टायगर श्रॉफ की पल्लवी जोशी वीकेंडला कोणी मारली बाजी? 'बागी ४'नं शनिवारी कमावले 'इतके' कोटी

Small Business Tips: Small Business सुरू करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि यशस्वी बनवा

Jalna Honour Crime : आधी गळा दाबून लेकीला संपवलं, नंतर बनाव रचला, पिक्चरपेक्षाही जालन्यात भयंकर घटना

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Ganpati Visarjan : गणपती विसर्जनाला गेलेले तीन तरुण बुडाले, एकाचा मृतदेह सापडला तर दोघे बेपत्ता

SCROLL FOR NEXT