Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : नेपाळी तरुणाला दिला पेठचा जन्म दाखला व आधार कार्ड; नाशिकमधील आधार केंद्रावरील दोघे ताब्यात

Nashik News : एका नेपाळी तरुणाला नाशिकच्या पेठ तालुक्यांमध्ये जन्म झाल्याचा दाखला आणि आधार कार्ड केवळ दोन हजार रुपयांमध्ये दिलं होत. असे काही प्रकार केल्याचे देखील समोर आले आहे

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : आधार कार्ड बनवण्यासाठी लागणाऱ्या जन्म दाखला आणि शाळा सोडल्याच दाखला दोन हजार रुपयांमध्ये बनवून आधार कार्ड काढून देणाचे काम नाशिकच्या एका आधार केंद्रावर केले जात होते. याचा माध्यमातून नेपाळी तरुणाला नाशिकचा नागरिक बनविण्याचे काम करण्यात आले होते. या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला असून याप्रकरणी दोन संशयतांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

नाशिकच्या (Nashik) म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून या तरुणांनी मखमलाबाद- मसरूळ या लिंक रोडवर तारांगण सर्विसेस हे आधार लिंक ऑफिस उघडलं होतं. यामध्ये त्यांनी एका नेपाळी तरुणाला नाशिकच्या पेठ तालुक्यांमध्ये जन्म झाल्याचा दाखला आणि (Aadhar Card) आधार कार्ड केवळ दोन हजार रुपयांमध्ये दिलं होत. असे काही प्रकार केल्याचे देखील समोर आले आहे. 

दरम्यान नेपाळी तरुणाच्या चारित्र्य दाखला तपासणीवरून म्हसरूळ पोलीसाना (police) व्यक्तीचा संशय आला. यानंतर त्यांनी तारांगण सर्विसेसच्या फकीरा हुमान व रमेश साळवे यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या कार्यालयातून एका कॉलेजच्या बनावट शिक्यासह, विधानसभा सदस्याची सही व शिक्का असलेले ५ अर्ज, विवाह नोदणी कागदपत्र ताब्यात घेतले. याबाबत त्यांची अधिक चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT