Nathsagar Dam : नाथसागरात केवळ पाच टक्के जलसाठा शिल्लक; गेल्या ५ वर्षातील सर्वात कमी जलसाठा

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरासह जवळपास ४०० गावांना नाथसागर धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. यातून सुमारे ४० लाख नागरिकांची तहान भागविली जाते
Nathsagar Dam
Nathsagar DamSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या नाथसागर धरणात केवळ ५ टक्के उपयुक्त जलसाठा हा शिल्लक राहिला आहे. गेल्या पाच वर्षात मे महिन्याच्या अखेरीस असलेला हा सर्वात कमी जलसाठा आहे. यामुळे पाणी टंचाईची भीषणता अधिक तीव्र झाली आहे. 

Nathsagar Dam
Nandurbar News : शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; दुष्काळी संकटात वीज तारांची चोरी, वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतीवर परिणाम

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) शहरासह जवळपास ४०० गावांना नाथसागर धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. यातून सुमारे ४० लाख नागरिकांची तहान भागविली जाते. मात्र गेल्या वर्षी कमी पाऊस पडला, त्यामुळे हा प्रकल्प पूर्णपणे भरला नाही. त्यामुळे रब्बी पिकांसाठी पाण्याचे रोटेशन आणि पाणी पुरवठा योजनेसाठी करण्यात येणारा उपसा यामुळे धरणातील पाणी पातळी कमी कमी होत गेली.

Nathsagar Dam
Jalgaon News : कुलरचा शॉक लागून एकाचा मृत्यू; पाणी टाकत असताना घडली घटना

मे अखेरपर्यंत साठा झाला कमी 

पाऊस कमी झाल्याने यंदा दुष्काळाचे सावट सर्वत्र घोंगावत होते. यात धरणात असलेला पाणी साठा बाष्पीभवनामुळे (Water Scarcity) कमी होत गेला. परिणामी नाथसागर धरणात सद्यस्थितीला केवळ ५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. मे महिना अखेरपर्यंत साथ कमी झाला असून मागील पाच वर्षातील हा सर्वात कमी साठा राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com