सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे संकट उभे असताना आता तार चोरांनी मांडलेल्या उच्छादामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे. थेट खाबावरच्या ताराच चोरीला जात असल्याने शेतीचा वीज पुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा परिणाम शेतीवर होत आहे.
दुष्काळाने शेतकरी (farmer) अगोदरच संकटात सापडला आहे. जमिनीतील पाणी पातळी खालावल्याने पिकांना पुरेसे पाणी देता येणे शक्य होत नाही. त्यात आता विद्युत तार चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अशातच प्रकाशा येथील सबस्टेशनवरुन सुरळीत विज पुरवठा होत नसल्याने या परिसरातील शेतकरी संपप्त झाले असून त्यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलनाची तयारी देखील सुरु केली आहे.
शेती पंपासाठी विद्युत पुरवठा (Nandurbar) मिळत नाही. यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. ऊस, कापूस, पपई या पिकांना पाण्याची अत्यावश्यक गरज असताना शेती पंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने पिकांना पाणी मिळत नाही. म्हणून पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून येत्या दोन दिवसात कृषी पंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्यात येईल; असे लेखी निवेदन प्रकाशा शेतकरीनी दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.