Manmad Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Manmad Bajar Samiti : मनमाडमध्ये खाजगी जागेत कांदा लिलाव; बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना नोटीस

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : हमाली, तोलाईच्या प्रश्नावरून नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये मागील दहा- बारा दिवसांपासून (Onion) कांदा लिलाव बंद आहे. अजूनपर्यंत तोडगा निघत नसल्याने (Manmad) मनमाडमध्ये व्यापारी व शेतकऱ्यांनी खाजगी जागेत लिलाव सुरु करताच बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. (Live Marathi News)

मनमाडसह अन्य ठिकाणच्या बाजार समितीमधील कांदा लिलाव गेल्या १२ दिवसापासून बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत होती. कांदा काढणी केल्यानंतर तो विक्रीस आणता येत नव्हता. दरम्यान आज मनमाड येथे व्यापारी व शेतकऱ्यांनी (Nashik) खाजगी जागेत कांदा लिलाव सुरू केला असता (Bajar Samiti) बाजार समिती प्रशासनाने त्यांना नोटिसा बजावल्या आहे. आज केवळ ८ ते १० वाहनातून शेतकऱ्यांनी (Farmer) कांदा विक्रीला आणला. त्याला १४०० रुपयांचा भाव मिळाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्हा निबंधकाचे आदेश 

१२ दिवसांपासून लिलाव बंद असल्याने व्यापाऱ्यांनी बाजार समितीत लिलाव करावे; असे आदेश जिल्हानिबंधकांनी दिले आहेत. त्यानूसार व्यापाऱ्यांना ह्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे व्यापारी आता काय निर्णय घेणार. बाजार समिती आवारात पुन्हा लिलाव सुरू होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT