Lok Sabha Election : काँग्रेसला आणखी एक धक्का; रत्‍नागिरीतील बडा नेता भाजपच्या वाटेवर

Ratnagiri News : मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १५ एप्रिलला प्रकाश मांडवकर काँग्रेसला रामराम ठोकणार असून भाजपमध्ये ते प्रवेश करणार आहेत.
Congress VS BJP
Congress VS BJPSaam TV

सुरज मसुरकर

Congress Vs BJP :

राजापूरमधून काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर हाती कमळ घेणार अशी महिती समोर आलीये. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मांडवकर भाजपमध्ये प्रवेश करतील.

Congress VS BJP
Congress Manifesto 2024 : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा जाहीर; 5 न्यायसहित दिल्या २५ गॅरंटी

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रकाश मांडवकर काँग्रेसला रामराम ठोकणार असून, रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १५ एप्रिलला ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रकाश मांडवकर कुणबी सहकारी पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. राजापूर तालुक्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचं मांडवकर यांनी स्वत: स्पष्ट केलंय.

राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू असताना मांडवकरांच्या या निर्णयाचा काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो. गेली ३२ वर्षे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुकयाच्या राजकारणात आणि समाजकारणात प्रकाश मांडवकर अग्रेसर राहिले आहेत.

माजी मंत्री आणि कुणबी समाजाचे दिवंगत नेते भाईसाहेब हातणकर यांचे मांडवकर हे खंदे समर्थक राहिलेत. काही काळ मांडवकरांनी भाईसाहेब यांचे स्वीय सहाययक म्हणुनही काम पाहिले होते. आपल्या तालुक्यात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून धडाडीचे कार्यकर्ते अशी प्रतिमा निर्माण केली. आता देखील तालुक्याच्या विकासासाठीच आपण भाजपमध्ये जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Congress VS BJP
BJP Manifesto: एलपीजी सिलेंडर 400 रुपयात; अरुणाचल प्रदेश निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा केला प्रसिद्ध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com