Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : ऑफिस बॉयनेच दिली मालकाला लुटण्याची सुपारी; पोलीस तपासात माहिती आली समोर, टोळीला अटक

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिकच्या महात्मा नगरमध्ये सिमेंट मालकाला लुटण्याची सुपारी देणार्‍या ऑफिस बॉय आणि पाच जणांच्या टोळीच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि डम डाटाच्या आधारे ही टोळी पोलिसांच्या ताब्यात सापडली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून, तीन जण रेकॉर्डवरील आरोपी आहेत. 

नाशिकमधील (Nashik) सिमेंट व्यावसायिक शारिक शेख, दीपक खताळे व ऑफिस बॉय जयेश वाघ हे १७ ऑगस्टला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कारने महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ आले. दिवसभरात झालेल्या व्यवसायाची दोन लाख रूपयांची रक्कम घेऊन त्यांच्या डाक सेवा मंडळ बिल्डींगमधील ऑफिसजवळ आले. शारीक शेख व दीपक खताळे हे रक्कम घेवुन ते कारमधून खाली उतरले. ऑफिस बॉय जयेश वाघ कार पार्क करत होता. त्यावेळी शारीक शेख व दीपक खताळे यांच्यावर चार अनोळखी (Crime News) युवकांनी चाकू, लाकडी दांडाने हल्ला केला.

इतकेच नाही तर संशयितांनी खताळे यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला केला. त्यावेळी शेख व खताळे यांनी हल्ला करणार्‍यांना प्रतिकार केला. यावेळी संशयितांनी खताळे यांच्या डोक्यावर वार केले. त्यात ते जखमी झाले. त्यानंतर शेख यांच्यावरही चाकूहल्ला केला. मात्र खताळे व शेख हे रक्कम घेऊन शेजारच्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये पळाले असता हल्लेखोरांचा डाव फसला. त्यानंतर संशयित दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी दीपक खताळे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार (Police) पोलिसांनी अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाने करत संशयितांना ताब्यात घेतले आहे. ऑफिस बॉय जयेश चंद्रकुमार वाघ, उदय राजेंद्र घाडगे, रोहित किशोर लोहिया, विराज कैलास कानडे, संकेत किशोर मंडलिक अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Travel : भारतातील 'या' 2 ठिकाणी येईल परदेशाचा अनुभव

Maharashtra News Live Updates: महिलांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो - आमदार देवेंद्र भुयार

Maharashtra Assembly Election : ठाकरे गटाचं विधानसभेचं जागावाटप ठरलं? शिवसेनेच्या बैठकीत आकडा झाला निश्चित; वाचा

Sarfaraz Khan : टीम इंडियात चान्स हुकला, पण खचला नाही! सरफराजनं ठोकलं द्विशतक, 52 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

VIDEO : 'सावरकरांबाबत संकुचित विचारसारणी हे मोठं आव्हान', सुशीलकुमार शिंदेंकडून सावरकरांचं कौतुक

SCROLL FOR NEXT