Nashik Bus Rickshaw Viral Video Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Bus Rickshaw Video : बसमधून रिक्षाला 'दे धक्का'! नाशिकमधल्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Nashik Viral Video : व्हायरल व्हिडीओमधील बसच्या मागे नाशिक महानगर परिवहन मंडळ' असे लिहिलेले आहे. यावरुन व्हिडीओ नाशिकमधील आहे हे स्पष्ट होते. या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा आहे.

Yash Shirke

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nashik Bus-Rickshaw Viral Video : नाशिकमधील एका व्हायरल व्हिडीओची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे. या व्हिडीओत बसमधून एक माणूस पायाने रिक्षाला धक्का देत असल्याचे दिसते. साधारणत: बाईक, स्कूटी किंवा रिक्षा एकमेकांना सपोर्ट देत असल्याचे पाहतो. पण बसने रिक्षाला धक्का देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जात आहे.

व्हिडीओमधील बसच्या मागे 'नाशिक महानगर परिवहन मंडळ' लिहिलेले स्पष्ट दिसते. यावरुनच हा व्हिडीओ नाशिकमधला आहे हे समजते. व्हिडीओत सिंटी लिंकच्या बसच्या पुढच्या दरवाज्यावर एक माणूस बाहेरच्या दिशेला उभा आहे. तो डाव्या पायाने बसच्या पुढे असलेल्या रिक्षाला धक्का देत आहे. यावरुन ती रिक्षा बंद पडली असावी आणि बसमधील माणूस रिक्षावाल्याला मदत करत असावा असा अंदाज बांधला जात आहे.

व्हिडीओमधील बसच्या मागे 'नाशिक महानगर परिवहन मंडळ' लिहिलेले स्पष्ट दिसते. यावरुनच हा व्हिडीओ नाशिकमधला आहे हे समजते. व्हिडीओत सिंटी लिंकच्या बसच्या पुढच्या दरवाज्यावर एक माणूस बाहेरच्या दिशेला उभा आहे. तो डाव्या पायाने बसच्या पुढे असलेल्या रिक्षाला धक्का देत आहे. यावरुन ती रिक्षा बंद पडली असावी आणि बसमधील माणूस रिक्षावाल्याला मदत करत असावा असा अंदाज बांधला जात आहे.

व्हायरल व्हिडीओमधील बस, बसचालक आणि रिक्षाला धक्का मारणारा व्यक्ती यांचा शोध नाशिक वाहतूक पोलीस घेत आहे. व्हिडीओतील बसचा क्रमांक ब्लर केला असल्याने ओळख पटवणे कठीण आहे. बसप्रमाणे रिक्षाचाही क्रमांक लपवण्यात आला आहे. यामुळे संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याचे आव्हान नाशिक वाहतूक पोलिसांसमोर आहे.

नाशिक शहराच्या अनेक सोशल मीडियाच्या पेजेस, अकाउंट्सवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओवरुन उलटसुलट चर्चा होत आहे. सोशल मीडियावर काहींनी या कृतीचे समर्थन केले आहे. तर काहींना या गोष्टीवर टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT