Amit Thackeray News Saamtv
महाराष्ट्र

Amit Thackeray News: गाडी थांबवली; उद्धट भाषा वापरली... सिन्नर टोलनाक्यावर नेमकं काय घडलं? अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

MNS Workers Vandalise Sinnar Toll Plazas: "राज साहेबांमुळे 65 टोल बंद झाले आणि माझ्यामुळे त्यात आणखी एकाची भर पडली.. असेही अमित ठाकरे म्हणाले...

Gangappa Pujari

सचिन बनसोडे, प्रतिनिधी...

Nashik News: मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यावेळी सिन्नर येथील टोल नाक्यावर गाडी अडवल्याचा प्रकार घडला. त्यानंतर संतप्त मनसैनिकांनी टोलनाकाच फोडला. या घटनेनंतर टोलनाक्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. याबाबत आता अमित ठाकरे यांनी सविस्तर खुलासा केला आहे..

काय म्हणाले अमित ठाकरे...

"शिर्डीत (Shirdi) साईबाबांच्या दर्शनानंतर वैयक्तिक कामासाठी समृद्धी महामार्गाने (Samruddhi Mahamarg) नाशिकला निघालो होतो. महासंपर्क अभियानाच्या दौऱ्यात पोलीस बांधव थकल्याने मी त्यांना शिर्डीच्या शासकीय विश्रामगृहात विश्रांती करण्यास सांगितले. यावेळी टोलनाक्यावर फास्टटॅगमधून टोल कट न झाल्याने दहा ते पंधरा मिनिटं टोल कर्मचाऱ्यांनी गाडी थांबवली."

"आम्ही त्यांना टेक्निकल इशू बाबत सांगितलं मात्र कर्मचारी उद्धट भाषा वापरत होते. माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की हे अमित ठाकरे (Amit Thackeray) आहेत. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकाला देखील फोन लावला. मात्र व्यवस्थापक देखील उद्धट भाषा वापरत होता. पंधरा ते वीस मिनिट गाडी थांबवून ठेवली आणि नंतर सोडली."

सिन्नर येथील मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी टोल नाका फोडला. मला नाशिकला पोहोचल्यावर कळलं की कार्यकर्त्यांनी टोल फोडला." असे अमित ठाकरे यांनी सांगितले. तसेच यावेळी पुढे बोलताना "राज साहेबांमुळे 65 टोल बंद झाले आणि माझ्यामुळे त्यात आणखी एकाची भर पडली. टोल कर्मचाऱ्यांनी उद्धट भाषा वापरल्यामुळे कार्यकर्त्यांनी टोल फोडला..." असे स्पष्टिकरण अमित ठाकरे यांनी दिले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT