Chhatrapati Sambhajinagar News: घरचे लग्न करेनात म्हणून 'तो' चोरु लागला महिलांची अंतर्वस्त्रे, संभाजीनगरमधील विचित्र घटना

Man Stealing Womens Undergarments In Sambhajinagar: या विक्षिप्त तरुणाला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला आहे. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
valuj Police Station
valuj Police Station Saam Tv
Published On: 

नवनीत तापडिया, संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar: सध्या राज्यामध्ये तरुणांच्या लग्नाचा विषय खूपच गंभीर झाला आहे. लग्न होत नाही आणि लग्नासाठी मुली मिळत नाही त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तरुणांनी आंदोलनं केली आहेत. अशामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chatrapati Sambhajinagar) धक्कादायक घटना घडली आहे. घरचे लग्न करुन देत नाहीत म्हणून एका तरुणाने महिला आणि तरुणींची अंतर्वस्त्रे चोरली आहेत. ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाल्यानंतर उघडकीस आली आहे. या विक्षिप्त तरुणाला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला आहे. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

valuj Police Station
Dhule News : मृतांच्या नातेवाईकांना मिळाली मदत; मुंबई- आग्रा महामार्गावर महिनाभरापूर्वी झाला होता अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, सिडको वाळूज महानगर परिसरात घराच्या बाल्कनी आणि आवारात वाळत घातलेली महिलांची अंतर्वस्त्रे गेल्या काही दिवसांपासून गायब होत होती. असे असताना देखील महिला याबद्दल काहीच बोलत नव्हत्या. पण अंतर्वस्त्रे चोरीच्या घटना काही थांबतच नव्हत्या. त्यामुळे या महिलांनी सोसायटीकडे तक्रार केली. त्यानंतर सोसायटीतील नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. त्यावेळी एक तरुण अंतर्वस्त्रे चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.

valuj Police Station
Sambhaji Bhide: चंद्रपुरात संभाजी भिडे यांच्या नियोजन बैठकीदरम्यान आयोजक अन् विरोधकांमध्ये जोरदार राडा

एक तरुण घरासमोर वाळत घातलेली महिलांची अंतर्वस्त्रे रात्री-अपरात्री चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाला होता. ही अंतर्वस्त्रे घेऊन तो ती परिधान करून अश्लील चाळे करत असल्याचे देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले होते. हे पाहून नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यांनी या तरुणावर पाळत ठेवली. हा तरुण वाळूज औद्योगिक परिसरात अंतर्वस्त्रे चोरी करताना दिसताच काही तरुणांनी त्याला पकडले आणि चांगलेच चोपून काढले.

valuj Police Station
Jalgaon Accident News : सुसाट कारचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार उलटली; महामार्गावरील थरार

नागरिकांनी या तरुणाला पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर वाळूज पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या तरुणाला वाळूज पोलिसांच्या दामिनी पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या तरुणाचे नाव सचिन असे आहे. या तरुणाची चौकशी केली असता त्याने जे काही सांगितले ते ऐकून पोलिसही चक्रावले. 'आई-वडील आपले लग्न लावून देत नाहीत त्यामुळे मी हे कृत्य करत होतो.', असे त्याने पोलिसांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com