Nashik Leopard
Nashik Leopard Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Leopard: बालकांना ठार मारणारा बिबट्या अखेर जेरबंद; इतिहासात पहिल्यांदाच होणार जन्मठेप?

अभिजीत सोनावणे

Nashik News: त्र्यंबकेश्वरच्या पिंपळदमध्ये दिड महिन्यांपासून वन विभागाला चकवा देणारा बिबट्या अखेर सोमवार (दि. २२) रोजी दुपारी जाळ्यात सापडला. या बिबट्या मादीचा स्वभाव आणि वर्तवणूक अत्यंत विचित्र व घातक स्वरूपाची असल्याचे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्याचे रक्त नमुने पुण्यात डीएनए चाचणीसाठी पाठवले जाणार आहे.

मयत झालेल्या बालिकेच्या स्वॅबसोबत हे नमुने जुळून आल्यास बिबट्या मादीला कायमस्वरूपी जन्मठेप भोगावी लागू शकते. असे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सांगितले आहे. असे घडल्यास इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या बिबट्याला जन्मठेप होऊ शकते.

याबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वरच्या पिंपळद परिसरात ३ बालिकांवर हल्ले करून त्यांना ठार मारणाऱ्या बिबट्याला कायमस्वरूपी पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात येणार आहे. गेल्या दीड महिन्यांपासून या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तयारी केली होती. मात्र बिबट्या काही हाती लागत नव्हता. (Latest Marathi News)

यामुळेच शार्प शुटरला बोलावून गोळी घालण्याचीही तयारी वन विभागाने केली होती. मात्र अखेर बिबट्या सोमवारी दुपारी वन पथकाच्या नजरेत आला आणि पथकाने चारही बाजूने त्याभोवती जाळ्या टाकून बिबट्याला जेरबंद केले.

दरम्यान, मयत देविकाच्या जखमांचे रक्त नमुने यापूर्वीच वन विभागाने पुणे (Pune) येथील प्रयोगशाळेला पाठवले आहेत. दरम्यान बिबट्याचे रक्त नमुने संकलित केले जाणार असून ते पुण्यात पाठवण्यात येणार आहे.

अहवालात मयत बालिकांच्या स्वॅबसोबत बिबट्याच्या स्वॅबचे नमुने जुळून आल्यास बिबट्याला कायमस्वरूपी पिंजऱ्यात बंदिस्त केले जाणार असून इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या बिबट्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याचे उदाहरण पाहायला मिळू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: रणरणत्या उन्हात दुचाकीस्वार चक्कर येऊन पडला; चोरट्यांनी २३ लाखांची बॅग पळवली, पुण्यातील घटना

Children Lunch Box : लहान मुलांना दुपारच्या जेवणात द्या 'हे' स्वादिष्ट पदार्थ; १० मिनीटांत ताट करतील रिकामं

Mumbai News : कर्जाचे हफ्ते थकलेल्या वाहनाची परस्पर केली विक्री; व्यावसायिकाच्या फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांकडून दोघांना ठोकल्या बेड्या

महाराष्ट्रातील कारागृहांत चाललंय तरी काय? कळंब्यात पुन्हा 10, भंडा-यात 1 मोबाईलसह बॅटरी जप्‍त

Loksabha Election: निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांकडून एका कुटुंबाला मारहाण? सुजय विखेंचा आरोप; नगरमध्ये राजकारण तापलं!

SCROLL FOR NEXT