Leopard And Peacock Death Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: शिकार करायला गेला अन् घात झाला; मोरासह बिबट्याचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Leopard And Peacock Death Due Electric Shock In Pimpalgaon: नाशिकमध्ये मोरासह बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

Rohini Gudaghe

तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक

नाशिक जिल्ह्यात मोरासह बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना २० जुलै रोजी समोर आलीय. बिबट्या मोराची शिकार करायला गेला होता, त्यावेळीच दोघांचाही मृत्यू झालाय. ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून मोर आणि बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. शिकार करायला गेलेल्या बिबट्याला काळाने कवटाळल्याचं समोर आलंय.

नक्की काय घडलं?

नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव नावाचं गाव (Nashik News) आहे. तेथे बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचं समोर आलंय. बिबट्या शिकारीच्या शोधात होता. त्यावेळी त्याला मोर दिसला. त्यामुळे बिबट्याने शिकार करण्यासाठी मोरावर झेप घेतली, अन् तिथेच घात झाला. बिबट्यासह मोराचा ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपळगावमध्ये घडली.

मोर आणि बिबट्यामध्ये थरार

हा बिबट्या नऊ वर्षांचा असल्याची माहिती मिळत आहे. मागील काही दिवसांपासून पिंपळगावमध्ये बिबट्याचा वावर होता. यापूर्वी देशमाने नावाच्या शेतकऱ्याच्या शेतातील चार कुत्रे त्याने फस्त केले (Leopard And Peacock Death) होते. याच परिसरात शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या बिबट्याने शनिवारी २० जुलै रोजी मध्यरात्री मोराचा पाठलाग केला होता. त्यामुळे मोर आणि बिबट्यामध्ये चांगलाच थरार रंगला होता.

विजेच्या धक्क्याने बिबट्यासह मोराचा मृत्यू

मोर मात्र जीव वाचविण्यासाठी जवळ असलेल्या विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर जाऊन बसला. तेव्हा त्याला पकडण्यासाठी बिबट्या देखील ट्रान्सफॉर्मरवर झेप घेतली. यावेळी ट्रान्सफॉर्मरचा बिबट्याच्या शेपटीला धक्का लागला. त्यामुळे विजेच्या धक्क्याने (Electric Shock) बिबट्यासह मोराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मृत मोरासह ९ वर्षीय नर जातीच्या बिबट्याचा पंचनामा केल्याची माहिती (Pimpalgaon) मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tara Sutaria-Veer Pahariya Breakup: तारा सुतारिया-वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? गायकाला किस करणं पडलं महागात

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

Valentine Day Love Letter: 'प्रेम हे फक्त प्रेम असतं, पहिलं-दुसरं असं काही नसतं'

Today Panchang: आजचे पंचांग आणि राशीसंकेत: शुक्रवार कोणासाठी ठरणार फायदेशीर?

SCROLL FOR NEXT