Malegaon Corporation Saam tv
महाराष्ट्र

Malegaon Corporation : महापालिकेच्या महत्वाच्या फाईल भंगार बाजारात; मालेगाव मनपात खळबळ

Malegaon News : फाईल गहाळ होण्याचे प्रकार अनेकदा झालेले देखील पाहण्यास मिळाले आहेत. परंतु मालेगाव महापालिकेतील महत्त्वाच्या फाईल चक्क भंगार बाजारात आढळून आल्या

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : महापालिकेचा भोंगळ कारभार नेहमीच पाहण्यास मिळत असतो. प्रामुख्याने फाईल गहाळ होण्याचे प्रकार अनेकदा झालेले देखील पाहण्यास मिळाले आहेत. परंतु मालेगाव (Malegaon) महापालिकेतील महत्त्वाच्या फाईल चक्क भंगार बाजारात आढळून आल्या आहेत. यामुळे महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. (Tajya Batmya)

नाशिकच्या मालेगाव महानगर पालिकेच्या वेगवेगळ्या विभागातील विशेषतः भागदारांच्या महत्वाच्या कागदपत्रांच्या फाईल थेट बुनकर बाजारात बेवारस स्थिती सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नागरीक समितीचे रामदास बोरसे यांना याची माहती मिळताच त्यांनी थेट घटनास्थळी जात पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडीस आला. सिटी (Police) पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी तेथे धाव घेत सर्व फाईल्स ताब्यात घेत त्याचा पंचनामा केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चौकशी करणार 

मालेगाव महापालिकेच्या या महत्वपुर्ण फाईली कोणी, कशा बेवारस ठिकाणी टाकल्या? याचा आता पोलिस शोध घेत असून महापालिकेत झालेल्या गैरव्यवहार लपविण्याचा कोणी प्रयत्न केला. या फाईल बाहेर कशा गेल्या याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत. नकुतेच नव्याने रुजू झालेले पालिका आयुक्त जाधव यांनीही याची चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT