तबरेज शेख
नाशिक : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. नाशिक शहरातील विविध भागांमध्ये चोरीच्या घटना घडत असताना चोरट्यांचा शोध लागत नाही. सातत्याने घडत असलेल्या या घटनांमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून चोरट्यांना लवकर ताब्यात घेण्याबाबत पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे.
नाशिक शहरात सोनसाखळी चोरीचा हॉट स्पॉट जयभवानी रोड, केजे मेहता स्कुल, सद्गुरू नगर, कमला पार्क येथे सोनसाखळी चोरी होणे नियमित झालेले आहे. सतत होणाऱ्या चेन स्नॅचिंगमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात जागोजागी लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज असून देखील चोर सापडत नाही. गेल्या दोन महिन्यामध्ये जवळपास १० ते १५ सोनसाखळी चोऱ्या झालेल्या आहेत. म्हणजेच कमीत कमी ७ ते ८ लाख रुपये किमतीचे सोने चोरांनी लुटले आहे.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
शहरात घडलेल्या सर्व सोनसाखळी चोऱ्या या काळा जॅकेट, सफेद बूट व काळ्या रंगाची बाईकवर असणारे चोर करत आहेत. हे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. परंतु या चोरांना पकडणे पोलिसांना शक्य झालेले नाही. हे सोनसाखळी चोर खास करून ६० वर्षावरील वृद्ध महिलांना टार्गेट करत आहे. दिवसा चोरी करण्याची मजल झाली आहे.
मनसेकडून आंदोलनाचा इशारा
मनसेच्यावतीने पोलीस प्रशासनाळक निवेदन देण्यात आले आहे. यात नाशिक शहर उपाध्यक्ष अॅड. नितीन पंडित यांनी फिरती गस्त वाढवा, संशयित दिसणाऱ्या व्यक्तीवर करडी नजर ठेवावी, काळा जॅकेट, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे सफेद बूट व काळ्या रंगाची बाईकवर फिरणारे चोरांचा शोध लवकरात लवकर घ्यावा. अन्यथा साखळी उपोषणाचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान नाशिक पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.