Nashik Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Crime : नाशिक हादरलं! साडेचार वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; संशयित आरोपीला अटक

अभिजीत सोनावणे

बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यातही अशाच प्रकारची संतापजनक घटना घडली. घरासमोर खेळत असलेल्या चिमुकलीचे एका नराधमाने अपहरण केले. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली सिन्नर तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ती घरासमोर खेळत असताना गावातीलच एका व्यक्तीने तिचे अपहरण केले.

त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Crime News) केला. बराच वेळी होऊनही चिमुकली घरी न आल्याने कुटुंबियांनी तिची शोधाशोध घेतली. तेव्हा संशयित आरोपी हा चिमुकलीसोबत दिसून आला. पीडितेच्या कुटुंबियांना पाहून तो पळून गेला.

यावेळी चिमुकली रडताना दिसून आली. तेव्हा चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा संशय कुटुंबियांना आला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

अकोल्यात ६ विद्यार्थिनींचा लैगिंक छळ

अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात हा संतापजनक प्रकार समोर आलाय. काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लिल व्हिडिओ दाखवत 6 विद्यार्थीनींचा छळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT