Nashik Farmers News Saam TV
महाराष्ट्र

Nashik News : नाशिक हादरलं! जमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याला जिवंत जाळलं; निफाड तालुक्यातील घटना

Nashik Farmers News : शेतजमिनीच्या वादातून एका वृद्ध शेतकऱ्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात घडली.

Satish Daud

शेतजमिनीच्या वादातून एका वृद्ध शेतकऱ्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात घडली. या घटनेत वृद्ध शेतकरी ९५ टक्के भाजला असून त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कचेश्वर नागरे (वय ८०) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नागरे कुटुंबियांनी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील (Nashik News) खर्डी सारोळे गावात ही घटना घडली आहे.

मृत कचेश्वर नागरे यांचा शेजारी राहत असलेल्या कुटुंबियांसोबत जमिनीवरून वाद सुरू होता. या वादातून आरोपींनी (Crime News) नागरे यांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत नागरे हे ९५ टक्के भाजले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शेजारी राहत असलेल्या कुटुंबियांकडूनच कचेश्वर नागरे यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय. आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका नागरे कुटुंबीयांची घेतली आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT