Manmad News Saam tv
महाराष्ट्र

Manmad News : मनमाडच्या अंकाई किल्ला परिसरात स्फोट; आवाजाचे गूढ कायम, नागरिकांमध्ये घबराट

Nashik News : भारत- पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने प्रमुख ठिकाणांवर अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पोलीस प्रशासन देखील सतर्क आहे. तर नागरिकांमध्ये घबराट असल्याचे पाहण्यास मिळत आहे

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : भारत- पाक युद्ध जन्य परिस्थिती आहे. यामुळे सध्या तणावाचे वातावरण आहे. अशी परिस्थिती असतानाच नाशिकच्या मनमाड जवळील अंकाई किल्ला परिसरात दोन दिवसांपूर्वी स्फोटा सारखे आवाज झाले होते. त्यामुळे आजूबाजूच्या अनेक गावापर्यंत त्याचा आवाज ऐकण्यास गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

भारत- पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने प्रमुख ठिकाणांवर अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पोलीस प्रशासन देखील सतर्क आहे. तर नागरिकांमध्ये घबराट असल्याचे पाहण्यास मिळत आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील मनमाडपासून जवळ असलेल्या अंकाई किल्ला परिसरात दोन दिवसांपूर्वी स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला आहे. मात्र हा आवाज नेमका कसला होता, हे अद्याप समोर आले नसल्याने आवाजाचे गूढ कायम आहे. 

पोलिसांकडून परिसरात शोध 

झालेल्या स्फोटाबाबत अंकाई गावातील नागरिकांनी याची माहिती मनमाड व येवला पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी सर्वत्र पाहणी करत तपास केला. संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र कुठेच काही आढळून आले नाही. मात्र आवाज कशाचा होता हे सुध्दा अंकाईच्या ग्रामस्थांना सांगता आले नाही. सकाळच्या सुमारास घडलेल्या आवाजामुळे पोलीस प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. 

आवाजाचे गूढ कायम 

तसेच परिसरातील खडी क्रेशर, विहीर ब्लास्टिंग करणाऱ्यांची चौकशी करण्यात आली. मात्र त्यांनीही कुठल्या प्रकारचे ब्लास्ट केले नसल्याचे सांगितले. या सर्व प्रकारामुळे आवाज कशाचा होता? याचे गूढ मात्र उकलू शकले नाही. खरे तर एखादे बलून रॉकेट गेले असेल आणि त्याचा आवाज झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT