Nashik Civil Hospital Saam tv
महाराष्ट्र

Nashik Civil Hospital : नाशिक जिल्हा रुग्णालयात मोठा घोटाळा; बनावट कंपनी दाखवून कोट्यवधींची फसवणूक

Nashik News : रुग्णालयातील मॉड्युलर आयसीयू उभारणीचे काम एका बनावट परवानाधारक कंपनीकडे देण्यात आल्याचा आणि त्यामुळे सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : कोरोना महामारीत अनेक रुग्णालयांनी पैसे लाटल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. तर आता याच काळात नाशिक जिल्हा रुग्णालयात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये बनावट कंपनी दाखवून रुग्णालयाचे काम देण्यात आल्याचे दाखवत सरकारची सुमारे ११ कोटी रुपयात फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. हा घोटाळा समोर आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. 

नाशिक जिल्हा रुग्णालय नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहे. यातच आता घोटाळा समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान कोव्हिड काळातील मोठा घोटाळा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. बनावट कंपनीला काम दिल्याचे दाखवत जवळपास ११ कोटींची फसवणूक झाली आहे. जिल्हा रुग्णालयासह मालेगाव सामान्य रुग्णालयातील मॉड्युलर आयसीयूच्या उभारणीचं काम बनावट परवानाधारक कंपनीला देऊन सरकारची कोट्यावधींची फसवणूक करण्यात आलीय. 

संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश  

दरम्यान या प्रकरणी कोव्हिड काळातील तत्कालीन नाशिक जिल्हा शल्यचिकित्सक, मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह संबंधित अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश नाशिक जिल्हा परिषदेच्या मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत. धक्कादायक म्हणजे नाशिक जिल्हा रुग्णालयात या माध्यमातून सुमारे ११ कोटींचा घोटाळा झाला आहे. 

घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता 

ठाणे येथील क्रेनोव्हेटिव्ह पॉवरटेक प्रा. लि. या कंपनीला काम देण्यात आले होते. मात्र, ही कंपनी बनावट परवाना वापरत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. तर संबंधित कंपनीने राज्यात अनेक सरकारी रुग्णालयांचे टेंडर मिळविल्याने या घोटाळ्याची व्याप्ती ५० कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याची पत्नी आणि वडील संबंधित कंपनीचे समभागधारक असल्याचे पुढे आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS: 'नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!', मनसेचा अमराठी भाषिकांना इशारा; संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष

Rinku Rajguru: में ख़ुद अपनी तलाश में हूँ...; रिंकू राजगुरुचे रॉयल लूक फोटो पाहिलेत का?

Tulsi For Mental Health : अशाप्रकारे करा तुळशीचा वापर, मानसिक तणावापासून सुटका मिळवा

Horoscope : 10 ते 15 ऑगस्टपर्यंत बारा राशींचे संपूर्ण राशी, वाचा फक्त एका क्लिकवर

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

SCROLL FOR NEXT