Gangapur Dam Saam tv
महाराष्ट्र

Gangapur Dam : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग; गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Nashik News : नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढली आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र कालपासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ८० टक्के भरले आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून गोदावरी नदीला देखील पूर आला आहे. 

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची (Gangapur Dam) पाणी पातळी वाढली आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नाशिकमध्ये (Nashik) गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरातील अनेक मंदिरांना गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडला आहे. तर गोदाघाट परिसरामध्ये जे छोटे पूल आहेत, ते देखील पाण्याखाली गेले आहेत. 

गंगापूर धरणातून सध्या ५०० क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, दुपारनंतर धरणातून साधारण १ हजार पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार (Godavari River) असल्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT