Nashik Leoprad News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Leoprad News : 16 पिंजरे, 25 ट्रॅप कॅमेरे तरीही थांगपत्ता नाही; नाशिकमध्ये बिबट्याला ठार मारण्याची मागणी

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानं या परिसरात १६ पिंजरे, २५ कॅमेरे लावलेत. मात्र तरीही बिबट्या हाती लागत नसल्याने अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील बिबट्याचा शोध घेतला जात आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

Nashik News : नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याची परवानगी वनविभागाने मागितली आहे. मागील ५ ते ६ महिन्यात या बिबट्यानं ४ निष्पाप बालकांचा बळी घेतला आहे. मात्र हा बिबट्या हाती लागत नसल्याने अखेर या बिबट्याला ठार करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. (Latest Marathi News)

नाशिकच्या (Nashik) जंगल आणि शेतांमध्ये सुरू असलेलं हे सर्च ऑपरेशन आहे, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी. गेल्या ८ दिवसांपासून वनविभाग आणि स्थानिक गावकरी मिळून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवरगाव, ब्राम्हणवाडे, पिंपळद गावांच्या परिसरात वनविभागाचे पथक २४ तास पहारा देत आहेत.

मागील ५ ते ६ महिन्यात या परिसरात बिबट्याच्या (Leopard) हल्ल्याच्या ६ घटना घडल्या असून यामध्ये ४ निष्पाप बालकांचा बळी गेला आहे. बळी गेलेल्या बालकांमध्ये ३ मुली आणि एका मुलाचा समावेश असून या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानं या परिसरात १६ पिंजरे, २५ कॅमेरे लावलेत. मात्र तरीही बिबट्या हाती लागत नसल्याने अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील बिबट्याचा शोध घेतला जात आहे. मात्र तरीही बिबट्याचा थांगपत्ता लागत नसल्याने अखेर या बिबट्याचा एन्काऊंटर करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. (Nashik News)

बिबट्या संरक्षित प्राणी असल्यानं बिबट्याला मारता येत नाही. मात्र बिबट्या नरभक्षक झाल्यास अथवा अन्य अपवादात्मक परिस्थितीत बिबट्याला ठार मारण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी अटी शर्ती आणि कडक नियम आहेत.

परवानगी मिळाल्यानंतर संबंधित बिबट्या हा नरभक्षक आहे, याची देखील शहानिशा करावी लागते. त्यामुळे या बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळते का? या बिबट्याचा एन्काऊंटर होणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरांटो प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

Monday Horoscope : या 7 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; वाचा सोमवारचं राशीभविष्य

CM थलपती विजय यांच्यानंतर आणखी एक अभिनेता येणार राजकारणात; चर्चांना उधाण

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT