Nashik Crime News: सख्ख्या भावांचा किरकोळ वाद विकोपाला; वादात वडीलांनाही केली मारहाण

सख्ख्या भावांचा किरकोळ वाद विकोपाला; वादात वडीलांनाही केली मारहाण
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam tv

तबरेज शेख

नाशिक : नाशिकच्या दिंडोरी रोडवरील निमानी बसस्थानकाच्या बाजूला एका टरबूज विक्रेत्याला (Nashik News) घरगुती कारणावरून भावांमध्‍ये वाद झाला. या वादात त्याच्या भावाने कोयत्याने वार करून त्याचा कान तोडून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Live Marathi News)

Nashik Crime News
Sambhaji Nagar: बायकोशी भांडण झालं, पतीनं विमानतळ उडवून देण्याची धमकी दिल्यानं प्रशासन हादरलं

सदर घटना नाशिक शहर वाहतूक पोलीस चौकीच्या समोर घटना घडली आहे. सोमनाथ आसाराम भोसले असं जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. भोसले निमानी बसस्थानकाच्या बाजूला टरबूज विक्रीचा व्यवसाय करतात. सकाळच्या दरम्यान सोमनाथ हा आपल्या दुकानावर टरबूज विक्री करत असताना त्याचा सख्खा भाऊ चेतन भोसले आणि त्याचे इतर चार-पाच साथीदार यांनी घरगुती कारणावरून वाद केला.

Nashik Crime News
Pune Crime News: बिर्याणी न दिल्याचा राग; हॉटेल चालकाला बेदम मारहाण

वडीलांनाही केली मारहाण

या वादात सोमनाथ याला कोयत्याने मारहाण केली. यात सोमनाथचा उजवा कान तुटून पडला आहे. त्याचे वडील आसाराम भोसले हे देखील वाद सोडवायला गेले असता त्यांना देखील चॉपरने वार करून त्यांना जखमी केले आहे. यादरम्यान सोमनाथ व त्याचे वडील या दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पंचवटी पोलीस स्टेशन करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com