Ajit Pawar And Amit Shah  saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News: अखेर अजित पवार यांनी मौन सोडले! वेषांतर अन् अमित शहांच्या भेटीवर पहिल्यांदाच बोलले, विरोधकांना दिलं मोठं चॅलेंज; वाचा..

Ajit Pawar Press Conference Nashik: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीआधी तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार हे वेष बदलून दिल्लीला जायचे, अमित शहांना भेटायचे अशा बातम्या समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

Gangappa Pujari

नाशिक, ता. २ ऑगस्ट २०२४

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीआधी तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार हे वेष बदलून दिल्लीला जायचे, अमित शहांना भेटायचे अशा बातम्या समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावरुनच संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांवर टीका केली होती. याबाबत आता स्वतः अजित पवार यांनी खुलासा करत वेषांतराचे आरोप फेटाळून लावले आहेत. नाशिकमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार?

"गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये, पेपरमध्ये बातम्या पाहिल्या. काही नेत्यांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या. अजित पवार वेष बदलून दिल्लीला जायचे हे धादांत खोटे आहे. मी राज्याचा ३५ वर्ष मंत्री आहे. नाव बदलून जाणे हा गुन्हा आहे. हे बिनबुडाचे, धादांत खोटे आरोप आहेत. या संदर्भात पुरावे नाहीत, आधार नाही. ही निव्वळ माझी बदनामी आहे," असे म्हणत अजित पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

वेषांतराचे आरोप फेटाळले!

"मी कोणावरही टीका न करता काम करायचे ठरवले आहे. विकासाचा मुद्दा, सरकारी योजनांबद्दलची माहिती देत आहे. आरोप करणाऱ्यांनी मला कुठे बघितलं? मी उथळ माथ्याने राजकारण करतो. मला लपून- छपून जाण्याची गरज नाही. ज्यांना आमचे काम बघवत नाही असे लोक फेक नरेटिव्ह सेट करत आहेत," असं अजित पवार म्हणाले.

तसेच "मला जायचं असेल तर उघडपणे जाईन, माझं संसदेला आव्हान आहे. याबाबत तपास करावा. खरं असेल तर मी राजकारणातून बाजूला जाईन, नसेल तर आरोप करणाऱ्यांनी राजकारण सोडावं," असे थेट आव्हानही अजित पवार यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT