Manoj Jarange vs Chhagan Bhujbal Latest News  Saam Tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News: 'मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच माझी भूमिका, पण...' छगन भुजबळ स्पष्टच बोलले

Gangappa Pujari

तबरेज शेख, प्रतिनिधी

Chhagan Bhujbal News:

अंबड येथून ओबीसी एल्गार परिषदेतून छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. जरंगे पाटलांनीही त्यांना जशास तसे उत्तर दिले होते. आज इगतपुरीमधील सभेतून छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन जरांगेवर निशाणा साधला आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सोहळा आणि भव्य शेतकरी मिळाव्यात ते बोलत होते.

काय म्हणाले छगन भुजबळ?

"मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण द्या, त्याला आमचा विरोध नाही. मात्र आमच्या आरक्षणाला धक्का देऊ नका. अशामुळे कोणालाच काही मिळणार नाही. जबरदस्तीने कोणाला ओबीसी मध्ये घुसवले तर परत कोर्ट कचेऱ्या होणार.." असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी बीड (Beed) हिंसाचारावरुन पुन्हा एकदा टीका केली. "आरक्षणासाठी जाळपोळ सुरू झाली आहे, ओबीसी आमदारांचे घर पेटवले. महापुरुषांनी कधी असे सांगितले होते का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

"मीडियासमोर एक बाजू आली की पोलीस हल्ला करता आहेत, पण त्या अगोदर काय झाले हे सांगितले जात नाही. प्रचंड दगडांचा मारा त्यावेळी झाला. महिला पोलिसांना मारले गेले. पोलिसांना मारले गेले म्हणून त्यांनी काठ्या चालवल्या. ज्यामध्ये ७० पोलीस जखमी झाले असे म्हणत तुम्ही शांततेने काय मागायचे ते मागा मी कधीच मराठ्यांना विरोध केला नाही. असेही भुजबळ म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून १२ वर्षीय मुलीने संपवलं जीवन, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : भरधाव ट्रकने चिरडले; १० गाई दगावल्या, नागपुरमधील घटना

Boat Capsized: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली; ७८ जणांना जलसमाधी, थरारक VIDEO

ऋषभ पंतची एक चलाखी आणि...; रोहित शर्माने ३ महिन्यांनी सांगितलं कशी पालटली भारताने हरलेली बाजी!

Vidhan Sabha Election : बच्चू कडूंना सर्वात मोठा धक्का; एकुलता एक आमदार फुटला, शिंदे गटाने पळवला

SCROLL FOR NEXT