Bus Conductor Badly Beaten By Passenger Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: तिकीटासाठी मुलाचे वय विचारल्यामुळे संतापला, कंडक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण; धक्कादायक CCTV

Bus Conductor Badly Beaten By Passenger: तिकीटासाठी लहान मुलाचे वय विचारल्यामुळे प्रवासी संतप्त झाला. त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने कंडक्टरला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Priya More

तरबेज शेख, नाशिक

नाशिकमध्ये बस कंडक्टरला प्रवाशाने बदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिकीटासाठी लहान मुलाचे वय विचारल्यामुळे प्रवासी संतप्त झाला. त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने कंडक्टरला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक ते सिन्नर मार्गावर ही घटना घडली आहे. सिटी लिंक बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला कंडक्टरने लहान मुलाचे तिकीटासाठी वय विचारले. त्यामुळे प्रवाशाला प्रचंड राग आला. दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर या व्यक्तीने आपल्या आपल्या साथीदारांच्या मदतीने एसटी कंडक्टरला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. चालत्या बसमध्ये ही घटना घडली.

सिटी लिंक बसमधून प्रवास करत असताना ही घटना घडल्यामुळे बसमध्ये गोंधळ उडाला. ही संपूर्ण घटना बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या मारहाणीमध्ये सिटी लिंक बस कंडक्टर सागर वाघमारे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करून सोडण्यात आले. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात ३ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT