Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार सुखकारक, आजपासून वेळापत्रकात बदल; लोकलच्या नव्या वेळा काय?

Western Railway New Schedule: पश्चिम रेल्वे आपल्या १५ डब्यांच्या लोकलची संख्या वाढवून ती २०९ वर केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर पश्चिम रेल्वेने १२ नव्या उपनगरीय लोकलगाड्या सुरू केल्या आहेत.
Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार सुखकारक, आजपासून वेळापत्रकात बदल; लोकलच्या नव्या वेळा काय?
Western Railway Saam TV
Published On

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दसऱ्यांच्या शुभ मुहूर्तावर पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गिफ्ट दिले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून लोकलच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आल्या आहेत. आता पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या १० लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसाला आता २०९ लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दी कमी होणार आहे आणि प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकारक होणार आहे. या नव्या वेळापत्रकाचा विरारकरांना चांगला फायदा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे आपल्या १५ डब्यांच्या लोकलची संख्या वाढवून ती २०९ वर केली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर पश्चिम रेल्वेने १२ नव्या उपनगरीय लोकलगाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे आता पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरीय लोकलगाड्यांच्या फेऱ्या १,३९४ वरून १४०६ ऐवढी झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे विरारवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून पश्चिम रेल्वे मार्गावर १२ डब्यांच्या १० विद्यमान लोकल १५ डब्यांच्या चालवण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने १२ डब्याच्या लोकल १५ डब्यांच्या करण्याच्या निर्णय घेतला आहे. डहाणू आणि विरार विभागातील प्रवाशांना विस्तारित केलेल्या उपनगरी रेल्वेगाड्यांचा फायदा होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार सुखकारक, आजपासून वेळापत्रकात बदल; लोकलच्या नव्या वेळा काय?
Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आज रेल्वेच्या या मार्गावर मेगाब्लॉक; लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द

पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये झालेला बदल -

- बोरिवली - चर्चगेट जलद लोकल बोरिवलीहून सकाळी १०.३६ वाजता सुटणार आहे. ही लोकल भाईंदरहून सकाळी १०.२१ वाजता सुटून चर्चगेटला सकाळी ११.२४ वाजता पोहचेल.

- विरार - अंधेरी जलद लोकल दादरपर्यंत विस्तारित केली आहे. ही लोकल विरारहून दुपारी ३.३६ वाजता सुटेल आणि दुपारी ४.४१ वाजता दादरला पोहोचेल.

- वसई रोड - चर्चगेट जलद लोकल आता विरारवरून सुटेल. वसई रोडवरून रात्री ८.४१ वाजता सुटणारी चर्चगेट जलद एसी लोकल आता विरारहून रात्री ८.२९ वाजता सुटेल आणि रात्री ९.५३ वाजता चर्चगेटला पोहोचेल.

- चर्चगेटहून सकाळी ९.१९ वाजता सुटणारी चर्चगेट - बोरिवली जलद लोकल लोकल विरारपर्यंत विस्तारित केली आहे. ही लोकल सकाळी १०.३९ वाजता विरारला पोहोचेल.

- दुपारी ४.३७ वाजता अंधेरी-विरार जलद लोकल दादरवरून दुपारी ४.४८ वाजता सुटेल. तर ही लोकल विरारला सायंकाळी ५.४४ वाजता पोहचेल.

- चर्चगेटहून सायंकाळी ७ वाजता सुटणारी चर्चगेट-वसई रोड जलद एसी लोकल विरारपर्यंत विस्तारित केली असून ही लोकल विरारला रात्री ८.२२ वाजता पोहचेल.

Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार सुखकारक, आजपासून वेळापत्रकात बदल; लोकलच्या नव्या वेळा काय?
Garba In Mumbai Local : ट्रेनने प्रवास करणारी नारी जगात भारी; धावत्या लोकलमध्ये गरब्यावर धरला ठेका, VIDEO पाहा

पश्चिम रेल्वेचा १५ वर्षांचा प्रवास -

२००९ - पश्चिम रेल्वेने दादर आणि विरार दरम्यान जलद मार्गावर १५ डब्याची लोकल सेवा सुरू केल्या.

२०११ - प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ ची लांबी वाढवल्यानंतर चर्चगेटपर्यंत सेवांचा विस्तार केला.

२०२१ - धिम्या मार्गावर १५ डब्यांची लोकल सेवा सुरू केल्या.

२०२४ - लोकल सेवांची संख्या २०० च्या पुढे घेऊन जाणार.

पश्चिम रेल्वे मार्गावरील आताच्या लोकल फेऱ्या -

- १५ डब्यांची लोकल फेऱ्या - २०९

- १२ डब्यांची लोकल फेऱ्या - १,१९७

- एकूण लोकल फेऱ्या - १,४०६ फेऱ्या

- यामध्ये एसी लोकलच्या ७९ फेऱ्यांचा देखील समावेश आहे.

- आधी पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्या - १,३९४

Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार सुखकारक, आजपासून वेळापत्रकात बदल; लोकलच्या नव्या वेळा काय?
Mumbai Local: मोठा दिलासा! मुंब्रा आणि कळवा स्थानकावर जलद लोकल थांबणार, पाहा नवं वेळापत्रक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com