Bank Robbery Saam TV
महाराष्ट्र

Bank Robbery: चोरट्यांनी बँक लुटण्यासाठी भिंतीला भलं मोठ भगदाड पाडलं, पण तोंड पाडूनच परतावं लागलं, नेमकं काय घडलं?

Nashik News : नाशिकच्या येवला तालुक्यातील जळगाव-नेऊर येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत ही घटना घडली.

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनावणे

नाशिक : नाशिकमधील येवलामध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. मात्र सुदैवाने दरोडेखोरांच्या हाती काहीही लागलं नाही. पोलिसांनी घटनेची दखल घेत आता दरोडेखोरांचा शोध सुरु केला आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भिंतीला भलं मोठ भगदाड पाडून लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. रोकड लुटण्याच्या उद्देशाने बँकेत घुसलेल्या चोरट्यांना बँकेत कुठलीही रोकड हाती लागली नाही. त्यामुळे चोरट्यांवर रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ आली. (Nashik News)

नाशिकच्या येवला तालुक्यातील जळगाव-नेऊर येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत ही घटना घडली. सकाळी बँक उघल्यावर बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या हा सगळा प्रकार लक्षात आला. मात्र बँकेत रोकडच नसल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. त्यानंतर बँकेचे कामकाज सुरळीत पणे सुरु झाले. मात्र बँकेत रोकड असती तर काय झालं असतं? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला असून चोरट्यांचा तातडीने शोध घेण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पोलीस प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake : मणिपूरला भूकंपाचे हादरे! ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Gold Rate Today: खुशखबर! चांदी ₹१०,०००नी स्वस्त ! सोन्याचे दर किती? वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Periods Mental Health : पीरियड्समध्ये न चुकता करा 'ही' कामे, चिडचिड अन् मूड स्विंग्स होणारच नाही

Who Is Rajnandini Pawar: महाराष्ट्राची कन्या देशात ठरली सर्वात सुंदर! कोण आहे राजनंदिनी पवार? 'मिस इंडिया 2026' ची उपविजेती

Bhendwal Bhavishyvani: यावर्षी पाऊस कसा राहिल? शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा; देशावर आर्थिक संकट, वाचा भेंडवळच्या घटमांडणीचा A टू Z अंदाज

SCROLL FOR NEXT