Nashik News
Nashik News  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: नाशिकमध्ये 55 गावांनी टेन्शन वाढवलं; गुजरातमध्ये सामील होण्यासाठी थेट गुजरातच्या अधिकाऱ्यांची भेट

अभिजीत सोनावणे

नाशिक : महाराष्ट्- कर्नाटक सीमावाद सुरू असताना आता नाशिकमधील काही गावातील गावकऱ्यांनी गुजरातमध्ये विलीनीकरण करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे आता पुन्हा नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील तब्बल 55 गावांनी आपली गावं गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

गुजरातमध्ये सामील होण्यासाठी या गावकऱ्यांनी थेट गुजरात गाठत गुजरातमधील वासदाच्या तहसीलदारांना यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केली आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती भागात ना दळणवळणासाठी रस्ते पोहचलेत, ना वीज, ना पाणी, ना आरोग्य सेवा. (Nashik News)

शिक्षणाची सुविधा नाही, मोबाईल नेटवर्क नाही, अशा अनेक सुविधांपासून सुरगाणा तालुक्यातील आदिवासी गावकरी वंचित आहेत. तर २ किलोमीटर अंतरावर गुजरात राज्यातील गावांमध्ये मात्र रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य अशा सर्व सोयी सुविधा मिळत असल्यानं या गावकऱ्यांनी आपली गावं गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची भूमिका घेतलीय. (Latest News Marathi)

त्यासाठी गुजरात विलीनीकरण संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून लवकरात लवकर आमची गावं गुजरातमध्ये विलीन करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा बघता नाशिकचे जिल्हाधिकारीही थेट सुरगाण्यात पोहचले असून ते इथल्या आदिवासी गावकऱ्यांशी संवाद साधत आहेत.

जिल्हाधिकारी गावकऱ्यांसोबत पायाभूत सोयी सुविधा आणि विकासकामांबाबत चर्चा करत आहेत. मात्र गावकरी गुजरातमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्यानं या प्रश्नावर तोडगा काढण्यात महाराष्ट्र सरकारला यश येतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Side Effect: दुध आरोग्यासाठी घातक; दुष्परिणामांची कल्पना आहे का?

Night Shift: नाइट शिफ्टमध्ये काम करणे धोकादायक! लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतोय

Rakhi Sawant Health Update: राखी सावंतला नेमकं काय झालं?, Ex Husband ने दिली हेल्थ अपडेट

Today's Marathi News Live : चंद्रबाबू नायडू कोल्हापूर आणि शिर्डीच्या दौऱ्यावर

Buldhana News : भुईमूग व कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; अवकाळी आणि सततच्या ढगाळ वातावरणाचा फटका

SCROLL FOR NEXT