Chhatrapati Shivaji Maharaj : निर्धार शिवसन्मानाचा या उदयनराजेंच्या आंदाेलनाला राजकीय वास असल्याची शंका आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी आज माध्यमांशी बाेलताना व्यक्त केली. सातारा पालिकेत घरपट्टी वाढ करु नये असे निवदेन देण्यासाठी आलेल्या राजेंना माध्यमांनी उदयनराजेंच्या (udayanraje marathi news) आंदाेलनात सहभागी झाला नाही असा प्रश्न केला. त्यावर राजेंनी आम्ही यापुर्वीच राज्यपाल भगत सिंह काेशयारी यांच्या वक्तव्याचा निषेध नाेंदवला असे नमूद केले.
राज्यपाल भगत सिंह काेशयारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या विधानावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्याची भावना काही दिवसांपासून राज्यभरात उमटू लागली आहे. काेशयारी यांचा वक्तव्याचा निषेध उदयनराजेंनी निर्धार शिवसन्मानाचा आक्राेश आंदाेलन करुन नाेंदवला.
खासदार उदयनराजेंच्या (udayanraje bhosale) निर्धार शिव सन्मान आंदोलनावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले राज्यपाल बदलण्याचे अधिकार राज्याला नाहीत दिल्लीत आहेत. जे आंदोलन करतायत त्यांनी दिल्लीत जाऊन बसावं. तिथं जाऊन राज्यपाल बदलण्याचा प्रयत्न करावा. नुसत इथे बसून दंगा आणि आंदोलन करून काही होणार नाही असेही राजेंनी म्हटलं.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले आमचा पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. त्यांचा नसेल बहुधा. या आंदाेलनामागे राजकीय स्वार्थ आहे की काय याची माहिती घेतली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.