Nashik News Missing Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: धक्कादायक..नाशिकमधील ४२ अल्पवयीन मुली, १६७ तरुणी बेपत्ता; चार महिन्‍यातील आकडेवारी

धक्कादायक..नाशिकमधील ४२ अल्पवयीन मुली, १६७ तरुणी बेपत्ता; चार महिन्‍यातील आकडेवारी

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : नाशिक शहरातून मागील ४ महिन्यात शेकडो मुली आणि महिला बेपत्ता झाल्याचे धक्कादायक (Nashik News) वास्तव समोर आले आहे. शहरातील वेगवेगळ्या पोलीस (Police) ठाण्यात याबाबत तक्रारी नोंदवण्यात आल्यात. (Tajya Batmya)

मुली आणि महिलांच्या मिसिंगच्या सर्वाधिक तक्रारी औद्योगिक क्षेत्र असलेल्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंदवण्यात आल्या आहेत. जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यात नाशिक शहरात अल्पवयीन मुलं, मुली बेपत्ता झाल्याचे तब्बल ११७ गुन्हे दाखल असून बेपत्ता झालेल्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. ११७ दाखल गुन्ह्यांपैकी ७६ प्रकरणात बेपत्ता मुलं, मुली सापडले असले तरी अद्याप ४२ अल्पवयीन मुली आणि ५ मुलं बेपत्ता आहेत.

बेपत्‍तामध्‍ये तरुण व पुरूषांचाही समावेश

१८ वर्षांवरील प्रौढ व्यक्तींच्या दाखल बेपत्ता गुन्ह्यांमध्ये १६७ तरुणी आणि महिला अद्याप बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर १२७ तरुण आणि पुरुषही मागील ४ महिन्यात बेपत्ता झाल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. त्यामुळे या बेपत्ता झालेल्या तरुण- तरुणी तसच प्रौढांना शोधण्याचं मोठं आव्हान सध्या नाशिक पोलिसांसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT