Nashik Ganesh Visarjan Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: बाप्पाला निरोप द्यायाल गेले असता अनर्थ घडला, नदीमध्ये बुडून २ जीवलग मित्रांचा मृत्यू

Nashik Ganesh Visarjan: नाशिकमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट लागल्याची घटना घडली. गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन जीवलग मित्रांचा वालदेवी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

Priya More

अभिजीत सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये गणेश विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली. बाप्पाला निरोप देण्यासाठी गेले असता अनर्थ घडला. नदीमध्ये बुडून दोन तरूणांचा मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आलेत. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट लागले. गणपती विसर्जनाला गेलेल्या दोन युवकांचा वालदेवी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात गणपती विसर्जन करत असताना ही घटना घडली. ओंकार गाडे आणि स्वयंम मोरे अशी या मृत तरुणांची नावं आहेत.

ओंकार गाडे आणि स्वयंम मोरे हे दोघे जीवलग मित्र होते. दोघेही संध्याकाळी मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेले होते. त्यावेळी नदीपात्रातील एका खड्ड्यात ते पडले. पण अग्निशमन दलाकडून मदत पोहचेपर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तब्बल १ तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. ओंकार शहरातील केटीएचएम महाविद्यालय तर स्वयंम अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

तर दुसरीकडे अमरावतीमध्ये गणेश विसर्जनादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. अचलपूर तालुक्यातील इसापूर येथे दोघांचा मृत्यू झाला. पूर्णा नगर नदीपात्रामध्ये गणपती विसर्जन करत असताना दोघे जण वाहून गेले. मयूर गजानन ठाकरे आणि अमोल विनायक ठाकरे अशी या दोन तरुणांची नावं आहेत. ते इसापूर येथील रहिवासी होते. तर दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथे गणपती विसर्जनादरम्यान राजेश संजय पवार (२७ वर्षे) या तरुणाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT