2 Best Friends Died After Drowning In Lake Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: खेकडे पकडायला गेले अन् घात झाला, जीवलग मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू

2 Best Friends Died After Drowning In Lake: नाशिकमध्ये ३ मित्र खेकडे पकडण्यासाठी शेततळ्यावर गेले होते. खेकडे पकडत असताना दोघांचा पाय घसरला आणि ते शेततळ्यात पडले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला.

Priya More

तरबेज शेख, नाशिक

नाशिकमध्ये शेततळ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या संजीवनगरमध्ये ही घटना घडली. खेकडे पकडण्यासाठी गेले असता शेततळ्यात दोघे पडले. अशातच पाण्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघांच्या मृत्यूप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या संजीवनगरमध्ये राहणारे तिघे मित्र खेकडे पकडण्यासाठी गेले होते. भोरमळ्यात असणाऱ्या शेततळ्यात ते खेकडे पकडत होते. खेकडे पकडत असताना दोघेजण पाय घसरून शेततळ्यात पडले. शेततळ्यात मोठ्याप्रमाणात पाणी असल्यामुळे आणि पोहता येत नसल्यामुळे दोघांचा देखील पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला.

मोहम्मद इरशाद शाह (११ वर्षे) आणि अशरफ खान (८ वर्षे) अशी मृत्यू झालेल्या दोन्ही मुलांची नावं आहेत. मोहम्मद आणि अशरफ दोघे खूपच चांगले मित्र होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल ४ तासांच्या प्रयत्नांनंतर दोघांचेही मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. या घटनेमुळे संजीवनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT