Nashik Tourist Places : अविस्मरणीय क्षणांचा अनुभव घ्यायचाय? नाशिकच्या 'या' ५ प्रेक्षणीय स्थळांना द्या भेट

Nashik Tourist Places in Marathi : तुम्हाला रोजच्या धावपळीच्या जीवनातून आराम घ्यायचा असेल तर नाशिकमधील काही प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकता.
अविस्मरणीय क्षणांचा अनुभव घ्यायचाय? नाशिकच्या 'या' ५ प्रेक्षणीय स्थळांना द्या भेट
Nashik Tourist Places Saam tv
Published On

मुंबई : प्रत्येकालाच रोजच्या धावपळीच्या जीवनातून आराम हवा असतो. सर्वांनाच फिरायला खूप आवडत असते. फिरण्याबद्दल चर्चा झाली की, सर्वांनाचे वेगवेगळे प्लान तयार होत असतात. त्याचबरोबर अनेक पर्यटक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या शहरांच्या शोधात असतात. स्वत:चा माईंड फ्रेश करण्यासाठी ही पर्यटन स्थळे फार उपयोगी ठरतात. तुमचा हा अविस्मरणीय प्रवास अजून आनंददायी ठरावा म्हणून तुमच्यासाठी नाशिक शहराच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती घेवून आलो आहेत. जेणे करुन तुमचा हा नाशिक प्रवास अजून अनुभवी होईल.

सौंदर्याने नटलेलं नाशिक हे शहर अनेक पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. नाशिक शहर हे जुन्या आणि नव्याचा मिलाप असल्यामुळे प्रसिद्ध आहे. या शहरांमध्ये पाहण्यासारखी खूप आकर्षक ठिकाणे आहेत. ज्यामुळे पर्यटक खूप गोष्टी एक्सप्लोर करु शकता. नाशिकच्या सुंदर वातावरणामुळे तुम्ही या शहराला भेट देण्यासाठी कधीही जाऊ शकतात. या वर्षी वीकेंडच्या सुट्टीचा पुरेपुर आनंद घेण्यासाठी नाशिक शहराला नक्की भेट द्या.

अविस्मरणीय क्षणांचा अनुभव घ्यायचाय? नाशिकच्या 'या' ५ प्रेक्षणीय स्थळांना द्या भेट
Kurla Tourist Places : कुर्ल्यामध्ये फिरण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे

त्र्यंबकेश्वर मंदिर

नाशिक शहरातील त्र्यंबकेश्वर मंदिर बारा ज्योतिलिंगासाठी खूप प्रसिद्ध आहे. या मंदिरात भगवान शिव स्तंभाच्या रुपात प्रकट होताना पाहयला मिळाले होते. हे मंदिर ब्रम्हगिरी, निलगिरी, आणि कलहरी या तीन टेकड्यांमध्ये पाहायला मिळते. नाशिकमधील हे त्र्यंबकेश्वर मंदिर अनेक पर्यटकांसाठी खूप प्रेक्षणीय ठरले आहे. या मंदिरात आपल्याला शांतता आणि एकांत पाहायला मिळेल.

रामकुंड

नाशिक शहरातील रामकुंड हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे तलाव हिंदू धर्मासाठी फार पवित्र आहे. या तलावात भगवान रामाने आपल्या वडिलांचा मृत्यू विधी केला होता. ज्यामुळे हा रामकुंड तलाव खूप प्रसिध्द आहे. या तलावाला भेट देण्यासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने येत असतात.

पांडव लेणी

नाशिकमधील पांडवलेणी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील आहे. चोवीस लेण्यांचा समूह असलेली ही लेणी शहराच्या मध्यभागी दहा किलोमीटर अंतरावर आहे. या लेणीमध्ये तुम्हाला बौद्ध धर्माच्या काळाचे शिलालेख आणि कोरीवकाम पाहायला मिळेल. या पांडवलेणीला एक पवित्र बौद्ध स्थळ म्हणून मानलं जात आहे. या लेणीला भेट देण्याची वेळ सकाळी ८:३० ते संध्याकाळी ५ :३० वाजेपर्यत आहे.

सोमेश्वर मंदिर

नाशिक शहरापासून सात किलोमीटर अंतरावर सोमेश्वर मंदिर आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. मनाची शांती आणि शांत वातावरण अनुभवन्यासाठी तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता. या मंदिरात भगवान शिवला मुख्य देवता मानलेले आहे.

अविस्मरणीय क्षणांचा अनुभव घ्यायचाय? नाशिकच्या 'या' ५ प्रेक्षणीय स्थळांना द्या भेट
Best Tourist Destination : जगातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ आपल्या महाराष्ट्रात, सौंदर्य पाहून हरवून जाल

दुगरवाडी धबधबा

पावसाळ्यात लक्ष वेधून घेणारा दुगरवाडी धबधबा सर्वाच्यांच मनाला प्रसन्न करत असतो. पर्यटकांना या धबधब्याला भेट देण्यासाठी एक ते दोन किलोमीटर ट्रेक करावे लागेल. सुट्टीचा पुरेपुर आनंद देणारे हे निसर्गरम्य ठिकाण अनेक पर्यटकांच्या खूप आवडीचे बनले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com