Shreya Maskar
समुद्राची ओढ प्रत्येकाला असते. त्यात जर कोकण समुद्रकिनारा असेल तर, स्वर्गाहून सुंदर दुसर काही नाही.
उसळणाऱ्या लाटा, फेसाळलेले धबधबे, सोनेरी वाळू पाहून मन आनंदाने बागडू लागते.
कोकण समुद्रकिनारा विविधतेने आणि सौंदर्याने नटलेला आहे.
कोकणातील संस्कृती पाहून मन प्रफुल्लित होत. येथील गडकिल्ले, धार्मिक स्थळे, थंड हवेची ठिकाणे पर्यटकांना साद घालतात.
धार्मिक पर्यटनासाठी कोकण प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला गणपतीपुळे, कुणकेश्वर मंदिराचे दर्शन घ्यायला मिळेल.
कोकणाला ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील लाभली आहे. येथे तुम्हाला सिंधुदुर्ग, रायगड, मालवण हे किल्ले पाहायला मिळतील.
कोकणात गेल्यावर कोकणच्या मेव्याचा आवर्जून आस्वाद घ्या. उदा. आंबा ,काजू , तांदूळ, जांभूळ, फणस
कोकणात लाखो पर्यटक येतात. त्यामुळे येथे खाण्यापिण्याची तसेच राहण्याची उत्तम सोय आहे.
कोकणात तुम्ही साहसी क्रीडा करू शकता. उदा. वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग