Shreya Maskar
परदेश दौरा कमी खर्चात करायचा असेल तर एक- दोन महिन्या आधीपासून त्याची तयारी करा. तसेच या टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचे जास्तीत जास्त पैसे वाचतील.
परदेश वारी दरम्यान एक महिना आधीच विमानाच तिकीटं बुक करा. म्हणजे तुम्हाला आवडती सीट मिळेल.
तुम्ही चांगल्या ट्रॅव्हल वेबसाइट्सचा बुकिंगसाठी वापर करू शकता. काही ट्रॅव्हल कमी खर्चात प्रवासाचा चांगला दर्जा देतात.
ऑनलाइन तिकीटे बुक केल्यास तुम्हाला ऑफर देखील मिळतील. जेणेकरून खर्च देखील कमी होईल.
सर्वात महत्त्वाचे भारतातूनच करनेन्सी एक्सचेंज करून परदेशात जा. नाहीतर जास्त पैसे मोजावे लागतील.
परदेशात जाताना स्वतःजवळ फॉरेक्स कार्ड ठेवा. यामुळे तुमच्या सोयीनुसार कोणत्याही देशाचं चलन ठेवता येतं.
तुम्ही जर कुटुंबासोबत परदेशाची ट्रीप प्लान करणार असाल तर एक प्रॉपर्टी बुक करा किंवा जर एकटे जात असाल तर आधीच हॉस्टेल बुक करा.
परदेशात कधीही सार्वजनिक वाहतूकीचा वापर करा. यामुळे खूप पैसा वाचतो.
परदेश दौरा करताना कोणतीच काम शेवटच्या क्षणासाठी ठेवून देऊ नका. कारण त्यामुळे आपला बजेट वाढतो. तसेच गोष्टी मनासारख्या मिळत नाहीत.