Shreya Maskar
पावसाळ्यात मित्रमंडळींसोबत नाशिकची सफर करा आणि मनसोक्त भिजा.
नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी वाढते.
ओले चिंब रस्ते आणि बहरलेला निसर्ग मनाला मोहून टाकतो.
नाशिकचा सोमेश्वर धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे.
नाशिकला डोंगरांमधून प्रवाहित होणारे धबधबे पाहणे म्हणजे निसर्गाचे अद्भुत रूप अनुभवणे होय.
या धबधब्या काही पायऱ्या आहेत, ज्यामुळे तुम्ही धबधब्याच्या आणखी जवळ जाऊ शकता.
नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात सोमेश्वर धबधबा वसलेला आहे.
सोमेश्वर धबधबा नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या पात्रात प्रवाहित होतो.
तुम्ही येथे फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.