Nashik Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nashik News : कबूतर शर्यतीवरून वाद, नाशिकमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या; तीन संशयित ताब्यात

Satish Daud

तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक

कबूतर शर्यतीच्या वादातून एका १७ वर्षीय मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली. पेठ रोडवरील कर्णनगर परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आशिष दशरथ रणमाळे (वय १७) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कर्णनगर पेठ रोड येथे राहणारा आशिष रणमाळे हा गुरुवारी रात्री त्याच्या घराबाहेर उभा होता.

त्याचवेळी चार ते पाच संशयितांनी अचानक त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात आशिष गंभीर जखमी झाला. आरडाओरड झाल्यानंतर संशयित हल्लेखोर फरार झाले. आसपासच्या नागरिकांनी उपचारासाठी आशिषला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. संशयितांची माहिती घेत काही तासांतच पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या. सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

प्राथामिक माहितीनुसार, बुधवारी कबुतर उडवण्याच्या शर्यतीवरून आशिष आणि संशयितांमध्ये वाद झाले होते. याच वादातून आशिषची हत्या झाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. भररस्त्यात तरुणाची हत्या झाल्याचं कळताच शहरात मोठी खळबळ उडाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

Arvind Kejriwal: दिल्लीत मी भाजपचा प्रचार करणार, असं का म्हणाले अरविंद केजरीवाल? वाचा...

VIDEO : तुतारीसाठी अनेक उमेदवार इच्छुक; मोठी अपडेट आली समोर

UPSC Success Story : वाह रे पठ्ठ्या! २ वेळा JEE पास करून IIT सोडलं; UPSC उत्तीर्ण होऊन IAS पदाचा राजीनामा, कोण आहे 'हा' जिगरबाज तरूण?

Chembur Fire News : चेंबूरमधील आग दुर्घटनेची CM शिंदेंकडून पाहणी; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहिर

SCROLL FOR NEXT