Akola News: दरोड्याचा प्लान फसला, नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी आवळल्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या

Akola Crime News: दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या ७ जणांना अकोला पोलिसांनी अटक केली आहे. या दरोडेखोरांकडून पोलिसांनी एका पिस्तूलासह ७ जिवंत काडतुसे आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
Akola News: दरोड्याचा प्लान फसला, नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी आवळल्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या
Akola Crime NewsSaam Tv
Published On

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यामध्ये (Akola News) दरोडा टाकण्यासाठी जात असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दरोडेखोरांकडून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. हे सर्व दरोडेखोर वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल ७ लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे. याप्रकरपणी पोलिसांनी (Akola Police) आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांची चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 7 जणांना अकोला पोलिसांनी अटक केली आहे. अकोला पोलिसांनी या आरोपींकडून एक बनावट देशी पिस्तूल आणि 7 जिवंत काडतूस जप्त केली. तसंच, दरोडा साहित्यसह 7 लाख 85 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात खामगावकडून येत असताना या टोळीला नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी अडवले. त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी पिस्तूल आणि दरोडासाठी लागणारे साहित्य आढळून आले.

Akola News: दरोड्याचा प्लान फसला, नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी आवळल्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या
Akola Crime News : घरी सोडण्याच्या बहाण्याने शेतात नेत ७८ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार, अकोल्यातील खळबळजनक घटना

याप्रकरणी अकोला पोलिसांनी राहुल भगवान खिल्लारे (वय २६ रा. शाहूनगर हिंगोली), ऋतिक कल्यानसव वाढवे (वय २१ पिंपळखेड जि. हिंगोली), सुर्यकिरण बळीराम चोरमल (वय २३ इसापूर स्मना, हिंगोली), अंकुश रगेश कंकाल (वय २२, सावरगाव (बडी) वाशिम), नितेश मधुकर रहनचय (वय ३३, वाशिम), सुमित शेषसय पुंडगे (वय २२ पिंपळखेड जि. हिंगोली) आणि देवानंद अमृता इंगोले (वय २६ रा. सावळी, वाशिम) या ७ जणांना ताब्यात घेतले आहे.

Akola News: दरोड्याचा प्लान फसला, नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी आवळल्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या
⁠Pune Porsche Car Accident Update : मी निबंध लिहून घेऊन जाऊ का? रॅप साँग व्हायरल करणाऱ्या शुभमचा पुणे पोलिसांच्या नोटिशीवर प्रश्न

बाळापुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल जुमळे यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी दरम्यान खामगाववरून बाळापूर शहराकडे येत असलेल्या एका पांढऱ्या कारची तपासणी केली असता त्यामध्ये ७ जण दिसून आले. पोलिसांना या सर्वांवर संशय आला. सर्वांची चौकशी केली आणि त्याच्या कारची तपासणी केली असता त्यामध्ये एक देशी पिस्तूलसोबतच सात जिवंत काडतूस आढळले. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली असता ते दरोडा टाकण्यासाठी जात असल्याचे समजले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलेले आहे. यामधील काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत.'

Akola News: दरोड्याचा प्लान फसला, नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी आवळल्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या
Mumbai Mega Block News: मेगाब्लॉकचा रेल्वे प्रवाशांना फटका; मुंबई-पुणे दरम्यान 29 एक्सप्रेस रद्द, लोकल प्रवाशांचेही हाल होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com