Nashik Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

VIDEO: अतिउत्साह नडला! अंजनेरी गडावर अचानक पाणी वाढलं, १० पर्यटक अडकले; हातात हात घालून उभे राहिले, ६ तासांचा थरार, पाहा

Nashik Latest News: नाशिकच्या अंजनेरी गडावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने १० पर्यटक अडकल्याची घटना घडली. तब्बल सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मानवी साखळी करत सर्व पर्यटकांना सुखरूप अंजनेरीवरून खाली आणले.

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. १५ जुलै २०२४

पावसाळ्याचे दिवस असल्याने राज्यभरातील विविध धरणे, नद्या भरुन वाहत आहेत. अशा ठिकाणी पर्यटकही मोठी गर्दी करताना दिसत आहेत. मात्र पर्यटनस्थळांवर उत्साही पर्यटकांच्या चुकांमुळे अनेक मोठ्या दुर्घटनाही काही ठिकाणी घडल्या. नाशिकच्या अंजनेरीवरही असाच धक्कादायक प्रकार समोर आला असून वनविभागाच्या सहाय्याने १० पर्यटकांची सुटका करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या अंजनेरी गडावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने १० पर्यटक अडकल्याची घटना घडली. या अडकलेल्या पर्यटकांची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुटका केली. रविवारी सुट्टीच्या दिवशी हे पर्यटक अंजनेरी गडावर फिरायला आले होते. मात्र दुपारच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने हे सर्व पर्यटक अडकून पडले.

प्रशासनाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला होता. मात्र तरीही हे पर्यटक गडावर फिरण्यासाठी गेले. मुसळधार पावसामुळे अंजनेरी गडावरील पायऱ्यांवरून वेगाने पाण्याचे लोंढे वाहू लागल्याने पर्यटकांची घाबरगुंडी उडाली. ज्यानंतर वनविभागाने धाव घेत या सर्व पर्यटकांची सुटका केली.

तब्बल सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मानवी साखळी करत सर्व पर्यटकांना सुखरूप अंजनेरीवरून खाली आणले. दरम्यान, पर्यटकांनी अतिउत्साह दाखवू नये, नियमांचं पालन करण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. वसाळी पर्यटनादरम्यान त्र्यंबकेश्वर परिसरात स्टंटबाजी करणाऱ्या 26 पर्यटकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून 23 हजारांचा दंडही वसूल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT